Join us  

"धोनी दोन आयपीएल, २०२२ चा विश्वचषक खेळेल"

सीएसकेच्या सीईओंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:12 AM

Open in App

नवी दिल्ली : माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचा भरवशाचा खेळाडू महेद्रसिंग धोनी काही दिवसातच क्रिकेट मैदानावर पुनरागमन करणार आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर वर्षभर क्रिकेट मैदानापासून दूर असलेला धोनी आणखी दोन आयपीएल खेळेल शिवाय तो २०२२ चा टी-२० विश्वचषकही खेळू शकेल, अशी अपेक्षा सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी बुधवारी व्यक्त केली.‘आम्ही ३९ वर्षांच्या धोनीबाबत अजिबात चिंता करत नाही. तो तंदुरुस्त आहे. पुढचे दोन्ही आयपीएल (२०२० आणि २०२१) तर खेळेलच, शिवाय २०२२ च्या विश्वचषकातही खेळू शकेल,’ असा विश्वास विश्वनाथन यांनी ‘इंडिया टुडे डॉट इन’शी बोलताना व्यक्त केला.सीएसकेने चेन्नईत १६ ते २० ऑगस्टदरम्यान लहान शिबिर घेण्याची योजना आखली आहे. १४ ऑगस्ट रोजी सर्व खेळाडू चेन्नईत एकत्र येतील. २१ ला संघ यूएईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.इंडिया सीमेंटस्चे उपाध्यक्ष आणि सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीला २०२१च्या लिलावात संघात कायम ठेवले जाईल, असे सूतोवाच केले होते. (वृत्तसंस्था)‘धोनीचा सध्याचा दिनक्रम काय हे मला माहिती नाही. मी जे काही ऐकतो ते मला प्रसारमाध्यमांद्वारे समजते. तो झारखंडमध्ये इन्डोअर नेटमध्ये प्रशिक्षण घेत आहे असे मी ऐकले. सध्या आम्हाला आमच्या कर्णधाराबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नाही. तो खेळण्यासाठी पात्र असेल की नाही याची आम्हाला मुळीच चिंता वाटत नाही. कारण त्याला त्याची जबाबदारी माहीत आहे. तो स्वत:ची आणि संघाची काळजी नक्की घेईल,’ असेही विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2020