Join us  

अवघं क्रिकेट विश्व जामनगरमध्ये! अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

Anant Radhika Wedding Photos: क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 2:45 PM

Open in App

Anant Ambani And Radhika Merchant | जामनगर: क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहकुटुंब गुजरातच्या जामनगरला पोहचला. त्याच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर दिसली. याशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनीही अंबानी यांच्या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

तसेच वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे देखील जामनरमध्ये दाखल झाले आहेत. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे सर्व मोठे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.

राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. यापूर्वी राधिका अंबानी कुटुंबाच्या अनेक फंक्शन्समध्ये झळकली आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग आणि लग्न मुंबईत होणार आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीसचिन तेंडुलकरसारा तेंडुलकरमहेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डइशान किशन