Join us  

... तर अखेरच्या 6 चेंडूंत क्षेत्ररक्षक कमी करणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा! नव्या युगाची, नवी लीग, Chris Gayle सदिच्छादूत

THE 6IXTY : क्रिकेट वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग ( Caribbean Premier League ) यांनी क्रिकेट विश्वाला नवी लीग देण्याचा प्रयत्न केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 7:15 PM

Open in App

THE 6IXTY : क्रिकेट वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग ( Caribbean Premier League ) यांनी क्रिकेट विश्वाला नवी लीग देण्याचा प्रयत्न केला आहे. CPL आणि CWI ने बुधवारी  THE 6IXTY या नव्या लीगची घोषणा केली आहे. 60-60 चेंडूंच्या म्हणजेच 10 षटकांच्या या लीगचे नियम भन्नाट आहेत. ही लीग पुरुष व महिला अशा दोघांसाठी असून यात जगातील स्टार खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. T10 क्रिकेटमध्ये ही एक नवी क्रांती असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  

या लीगचे नियम

  • 6 विकेट्स पडल्या तर संघ ऑल आऊट 
  • 2 षटकं पॉवर प्ले, तिसरा पॉवर प्ले अनलॉक करण्यासाठी पहिल्या 12 चेंडूंत किमान दोन षटकार मारणे आवश्यक
  • पॉवर प्लेचे हे तिसरे षटक संघ 3 ते 9 व्या षटकादरम्यान केव्हाही घेऊ शकतो
  • एका एंडने 30 चेंडू फेकली जाणार आणि पाच वेगवेगळ्या षटकांत हे 30 बॉल फेकावे लागतील 
  • एक गोलंदाज 2 पेक्षा अधिक षटकं फेकू शकणार नाही.  
  • निर्धारीत वेळेत संघाने षटकं पूर्ण न केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एका खेळाडूला अखेरच्या 6 चेंडूंसाठी मैदानाबाहेर करण्यात येईल
  •  24 ते 28 ऑगस्ट या कालावधीत सेंट किट्स व नेव्हिस येथे ही लीग खेळवण्यात येणार आहे.    
टॅग्स :ख्रिस गेलटी-10 लीग
Open in App