Join us  

क्रिकेट जगायला हवे, पैशाची लालसा नाही- टिम पेन

आॅस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर वेतन कपातीच्या प्रस्तावावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:27 AM

Open in App

मेलबोर्न : ‘देशात क्रिकेट जिवंत राहावे. खेळाची प्रगती व्हायला हवी. क्रिकेटसाठी वेतन कपातीचा प्रस्ताव आल्यास मी आणि माझे सहकारी पैशाची कुठलीही लालसा न बाळगता सहर्षपणे स्वीकार करू.’ आॅस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर वेतन कपातीच्या प्रस्तावावर ही प्रतिक्रिया दिली आहे.भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा आणि टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियावर मोठो आर्थिक संकट ओढवले. सीएने ८० टक्के कर्मचारी अािण सपोर्ट स्टाफला घरी बसवले. त्यांच्यासाठी सुपर मार्टमध्ये नोकरीचा शोध सुरू केला. आता खेळाडूंच्या संभाव्य वेतन कपातीबाबत आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्स संघटनेसोबत(एसीए)चर्चा सुरू झाली आहे. एबीसी रेडिओशी बोलताना पेन म्हणाला, ‘खेळाची वास्तविक स्थिती काय आहे, हे माहिती झाल्यास माझ्यासह सर्व सहकारी लालसा दाखवणार नाहीत. क्रिकेटची प्रगती होत राहिली तरच आमची, कर्मचाऱ्यांची आणि क्रिकेट आॅस्ट्रेलियाची उपजीविका कायम असेल. सध्या वेतनात कपात होत असेल आणि भविष्यात लाभ होत असेल तर सर्वजण विचार करतील. बोर्डाच्या आर्थिक स्थितीबाबत मीदेखील चिंताग्रस्त आहे.’कोरोनाचा व्यावसायिकदृष्ट्या सर्वच प्रायोजकांना फटका बसला. क्रिकेट आॅस्ट्रेलियावर भविष्यात याचा ताण येईल. भारताने आॅस्ट्रेलियाचा दौरा केला नाही तर क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे ३० कोटी डॉलरचे नुकसान होईल. आॅस्ट्रेलियाच्या सीमा ३० सप्टेंबरपर्यंत सील करण्यात आल्या आहेत, मात्र भारत दौºयासाठी प्रवास सवलत देण्याचा सरकार विचार करीत आहे. (वृत्तसंस्था)भारताने दौरा न केल्यास पर्यायी योजना तयार करण्यात आली आहे काय, असे विचारताच पेन म्हणाला, ‘मला याची माहिती नाही. कोहली आणि त्याचा संघ निर्धारित वेळेत आॅस्ट्रेलिया दौरा करेल अशी आशा असून यामुळे अनेक समस्यांवर मात करता येणार आहे. चार्टर्ड विमानसेवेद्वारा भारतीय संघाला येथे पाचारण करणे आणि आल्यानंतर सर्व खेळाडूंना १४ दिवस एकाच हॉटेलमध्ये वास्तव्याच्या सुविधा पुरविणे असे उपाय आमचे सरकार शोधत आहे. याशिवाय न्यूझीलंडला आमच्याकडे बोलावणे आणि आमचा न्यूझीलंड दौरा ठरविण्याची योजना आखण्यात येत असल्याचे समजले आहे.’>क्लार्कने नावे सांगायला हवीआयपीएल खेळता यावे यासाठी आॅस्ट्रेलियाचे खेळाडू विराट कोहलीचे ‘लांगूलचालन’ करतात, या मायकेल क्लार्कच्या दाव्याबाबत विचारताच पेन म्हणाला,‘ आॅस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आरोप करतेवेळी संबंधित खेळाडूंची नावे सांगयला हवी होती. मोठे वक्तव्य करून कुणाला त्रास देण्याची सवय असेल तर क्लार्कने वैयक्तिक नावे सांगायला हवी. त्याने ते केले नाही. मी स्वत: मैदानावर असतो, कोहलीविरुद्ध कुणीही नरमाई स्वीकारलेली नाही. क्लार्कच्या वक्तव्यात तथ्य नाही.’