Join us  

मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेट लीगमधल्या संघ मालकाला अटक; क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील खेळाडू आणि संघ मालकांच्या जवळच्या व्यक्ती फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये अडकल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 6:34 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेटला लागलेला मॅच फिक्सिंग कीड अजूनही संपलेली नाही. आयपीएलमध्ये आपण स्पॉट फिक्संगपासून सट्टेबाजीपर्यंत बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. या साऱ्या वाईट गोष्टींमुळे संघांवर बंदी आणल्याचेही आपण पाहिले आहे. पण तरीही क्रिकेटच्या लीगमधील या गोषीट काही कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील खेळाडू आणि संघ मालकांच्या जवळच्या व्यक्ती फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये अडकल्या होत्या. पण आता तर क्रिकेटच्या लीगमध्ये चक्क मालक मॅच फिक्सिंग करत असल्याचे समोर आले आहे. क्राइम ब्रँचने ही कारवाई केली असून आता या संघ मालकाची कसून चौकशी होणार आहे.

क्रिकेटच्या लीगमधील संघांची मालकी काही उद्योगपतींनी घेतली आहे. या उद्योगपतींमधील एकाने क्रिकेटच्या लीगमधील संघ विकत घेतला आणि आता तोच मॅच फिक्सिंग करत असल्याची गोष्ट सर्वांपुढे आली आहे. या साऱ्या गोष्टीमुळे क्रिकेट जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यात्रा आणि पर्यटन या व्यवसायात हा उद्योगपती चांगलाच प्रसिद्ध आहे. या उद्योगपतीने बंगळुरुस्थित एक संघ विकत घेतला. त्यानंतर या संघातील काही खेळाडूंना हाताशी घेऊन त्याने मॅच फिक्सिंग केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या संघावर बंदी आणण्याची शक्यता आहे.

ही गोष्ट घडली आहे ती कर्नाटॉक क्रिकेट लीगमध्ये. या लीगमध्ये बेलागवी पँथर्स नावाचा एक संघ आहे. या संघाची मालकी अश्फाक अली या उद्योजकाकडे आहे. अली हा मॅच फिक्सिंग करत असल्याचा आरोप क्राइम ब्रँचने केला आहे. त्यामुळे आता अली आणि त्याच्या संघाचे भवितव्य अधांतरी आहे.

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीकर्नाटक