Join us  

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने हॉटेलमधील इम्रान खानचा फोटो झाकला

पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:49 PM

Open in App

मुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानचा फोटो झाकत पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. 

पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला. सीसीआई हा बीसीसीआयचा मान्यताप्राप्त क्लब आहे. सीसीआयच्या या हॉटेलमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बाजुलाच इम्रान खान यांचा वॉलपेपर लावलेला होता. तो झाकण्यात आला आहे. 

 

सीसीआयच्या या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये 1992 मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा इम्रान खानचा फोटो आहे. यावर सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदाणी यांनी सांगितले की, सीसीआय हा एक खेळाशी संबंधीत क्लब आहे. काश्मीरमधील हल्ल्याचा ऩिषेध व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला.

 

टॅग्स :बीसीसीआयपुलवामा दहशतवादी हल्ला