Join us  

ऑस्ट्रेलिया लागली कामाला! वन डे विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी उतरवला तगडा संघ

IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे.  

By ओमकार संकपाळ | Published: August 07, 2023 12:09 PM

Open in App

नवी दिल्ली : आगामी वन डे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी कांगारूच्या संघाची घोषणा झाली आहे. भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी यजमान भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरूद्ध अग्निपरीक्षा असणार आहे. कारण ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे विश्वचषकापूर्वी टीम इंडिया बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्हीही संघ विश्वचषक खेळतील. मग पुन्हा एकदा ट्वेंटी-२० मालिकेत हे संघ आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियन संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.  दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - मिचेल मार्श (कर्णधार), सीन अबॉट, जेसन बेहरड्रॉफ, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन हार्डली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगिल्स, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा. 

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वन डे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अबॉट, ॲश्टन अगर, अलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डली, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिड हेड, जोश इंगिल्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा. 

वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा२२ सप्टेंबर, शुक्रवार - मोहाली, दुपारी १.३० वाजल्यापासून२४ सप्टेंबर, रविवार - इंदौर, दुपारी १.३० वाजल्यापासून २७ सप्टेंबर, बुधवार - राजकोट, दुपारी १.३० वाजल्यापासून

ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

२३ नोव्हेंबर, गुरूवार - वायझॅग, सायंकाळी ७ वाजल्यापासून२६ नोव्हेंबर, रविवार, त्रिवेंद्रम, सायंकाली ७ वाजल्यापासून२८ नोव्हेंबर, मंगळवार, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजल्यापासून१ डिसेंबर, शुक्रवार, नागपूर, सायंकाळी ७ वाजल्यापासून३ डिसेंबर, रविवार, हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकास्टीव्हन स्मिथ
Open in App