Join us  

क्रिकेट : अखिलेश, शिवाई, ब्रावोची विजयी सलामी

शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या फेरीत उमेश कदम, युवराज सिंगच्या तडाखेबंद खेळीने अखिलेश संघाला 140 धावांपर्यंत मजल मारून दिल्यानंतर सरदार पटेल अकादमीचा पूर्ण डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:22 PM

Open in App
ठळक मुद्देसावंत क्रिकेट अकादमीच्या ब संघाने एक गडी राखून थरारक विजयाची नोंद केली.

मुंबई : काऊंटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अखिलेश, शिवाई आणि ब्रावो या क्रिकेट अकादमीच्या संघांनी दणदणीत विजयी सलामी दिली. सावंत क्रिकेट अकादमीच्या ब संघाने एक गडी राखून थरारक विजयाची नोंद केली.

शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या फेरीत उमेश कदम, युवराज सिंगच्या तडाखेबंद खेळीने अखिलेश संघाला 140 धावांपर्यंत मजल मारून दिल्यानंतर सरदार पटेल अकादमीचा पूर्ण डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळला आणि अखिलेशने 60 धावांनी सहज विजय मिळविला. प्रत्युश मिस्त्रीने10 धावांत 4 बळी टिपत सर्वोत्तम कामगिरी केली. ब्रावो संघाने सुचित कदमच्या फटकेबाज 43 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर 5 बाद 104 अशी मजल मारली आणि त्यानंतर यश देसाई (3 बळी) आणि सिद्धार्थ चांडक-करण सिंग (प्रत्येकी 2बळी) यांनी दादर क्रिकेट क्लबचा डाव 78 धावांतच संपुष्टात आणला.

 संक्षिप्त धावफलकअखिलेश क्रिकेट अकादमी- 20 षटकांत सर्वबाद 140 ( उमेश कदम 35, युवराज सिंग 30, श्रेयस सानप 25 ; नवीन कोळी4/23, संदीप पाटील 3/26) वि. वि. सरदार पटेल क्रिकेट अकादमी - सर्वबाद 80 ( ऋषी पिल्ले 22, अमित साटम 15 ;लोकेश मिस्त्री 3 /20, प्रत्युष चटवानी 4/10, निमेश कदम3/20)

शिवाई क्रिकेट अकादमी- 20 षटकांत 5 बाद 125 ( विपुल पाटील 39, हृदय मेहता 23, अभिषेक जाधव 25 ; मिहीर सावकार  3/16) वि. वि. सावंत क्रिकेट अकादमी (अ) - 10.5षटकांत सर्वबाद 50 ( वेदांत यादव 30, आलोक सरोज 12 )

ब्रावो क्रिकेट अकादमी - 20 षटकांत 5 बाद 104 ( सुचित कदम 43, ध्रुव तन्वी 31) वि.वि. दादर क्रिकेट क्लब - 17 षटकांत सर्वबाद 78 ( वरद साखरकर 25, ओमकार शेट्टी 20, आदित्य हजारे 21; यश देसाई 3/15, करण सिंग 2/8)

राज क्रिकेट अकादमी- 20 षटकांत 8 बाद 88 ( श्रवण शेट्टी 24,अनिश शिंदे 20; तनुष कनौजिया 3/20, भुपेंद्र वाघेला 2/6, )पराभूत वि. सावंत क्रिकेट अकादमी - 18.1 षटकांत 9 बाद 89 ( वैभव सिंग 25, जेहान कुबेडिया 20, पवन तिवारी 3/22,ओजस पाटील 3/5)

टॅग्स :मुंबई