Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : रिषभ पंत चिडला, फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवू लागला, Umpire ने No Ball न दिल्याने सारा ड्रामा झाला!

जोस बटलरचे ( Jos Buttler ) शतक अन् संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कलच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने IPL 2022 मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. त्यानंतर आर अश्विन व प्रसिद्ध कृष्णा यांनी दिल्लीला धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:50 PM2022-04-22T23:50:21+5:302022-04-22T23:53:41+5:30

whatsapp join usJoin us
Crazy moments in IPL 2022 DC vs RR Live Updates : Rishabh Pant calling back Rovman Powell and Kuldeep Yadav but umpires denied | Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : रिषभ पंत चिडला, फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवू लागला, Umpire ने No Ball न दिल्याने सारा ड्रामा झाला!

Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : रिषभ पंत चिडला, फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवू लागला, Umpire ने No Ball न दिल्याने सारा ड्रामा झाला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने ( RR) वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) दणदणीत विजयाची नोंद केली. पृथ्वी शॉ व रिषभ पंत यांनी संघर्ष केला, परंतु तो तुटपुंजा ठरला. शतकवीर जोस बटलर आजच्या सामन्याचा स्टार ठरला. प्रसिद्धने १९वे षटक निर्धाव फेकून दिल्लीच्या संघर्षाची हवाच काढली. पण, अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ६ चेंडूंत ३६ धावांची गरज असताना दिल्लीच्या रोव्हमन पॉवेलने तीन चेंडूंवर खणखणीत षटकार खेचले. 

तिसऱ्या चेंडूनंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भडकला. त्याने त्याच्या फलंदाजांना मैदान सोडून माघारी येण्याचा इशारा केला. वानखेडे स्टेडियमवर चिटर चिटरचा नारा घुमला. दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आम्रे डग आऊट सोडून मैदानावर अम्पायरशी हुज्जत घालण्यासाठी धावले. ओबेय मकॉयने टाकलेला फुलटॉस चेंडू नो असल्याचा दावा दिल्लीच्या चमूने केला आणि ते त्यांच्या मतावर ठाम होते. युजवेंद्र चहल खेळपट्टीवर फलंदाजीला असलेल्या कुलदीप यादवची समज काढत होता. तर चिडलेल्या रिषभसोबत सीमारेषेवर असेलला जोस बटलर वाद घालताना दिसला. या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णयावर बोट ठेवण्यात आले.





दरम्यान जोस बटलरच्या ११६ धावा, देवदत्त पडिक्कलच्या ५४ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ ( ३७) , डेव्हिड वॉर्नर ( २८), रिषभ पंत ( ४४) व ललित यादव ( ३७)  व रोव्हमन पॉवेल ( ३६) यांनी दमदार खेळ केला. दिल्लीला ८ बाद २०७ धावाच करता आल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर आर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: Crazy moments in IPL 2022 DC vs RR Live Updates : Rishabh Pant calling back Rovman Powell and Kuldeep Yadav but umpires denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.