Join us  

Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही

भारतात क्रिकेटची केवढी क्रेझ आहे, हे सांगायला नको. त्यामुळे जिथे जिथे क्रिकेटपटू तिथे चाहत्यांचा गोतावळा जमलाच पाहीजे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:08 AM

Open in App

भारतात क्रिकेटची केवढी क्रेझ आहे, हे सांगायला नको. त्यामुळे जिथे जिथे क्रिकेटपटू तिथे चाहत्यांचा गोतावळा जमलाच पाहीजे. क्रिकेटपटूही वेळातवेळ काढून आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ देतात, सेल्फी काढण्यासही परवानगी देतात. अशीच एक चाहती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांना चकवून धावत आली, परंतु त्यानंतर विराटनं केलेल्या कृतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगासह क्रीडा क्षेत्राला फटका बसला आहे. अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन डे मालिकाही रद्द करावी लागली. धरमशाला येथील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढल्यानं ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. सध्या बहुतेक खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाणं ते टाळत असून घरीच राहणे पसंत करत आहेत. 

आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर कोहली विमानतळावरून परतत होता. त्यावेळी एक तरुणी कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी धावत आली, परंतु कोहलीनं तिच्याकडे न पाहिल्यासारखे केले आणि पुढे निघून गेला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोहलीसह अनेक खेळाडू चाहत्यांपासून दूर राहणेच पसंत करत आहे. कोहलीच्या या कृतीचे कौतुक होत आहे.  

पाहा व्हिडीओ दरम्यान, शुक्रवारी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी चाहत्यांना आवाहन केलं. शुक्रवारी विराट आणि अनुष्का यांनी एकत्रित एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ''आपण सर्व एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आम्ही दोघंही स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेसाठी घरीच थांबत आहोत. एकांतवासात जाऊन सुरक्षित राहू....,'' असा संदेश या दोघांनी दिला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार

'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...

OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह

टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक

coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प

टॅग्स :विराट कोहलीकोरोना वायरस बातम्या