Join us  

Coronavirus: इंग्लंड दौऱ्याआधीच पाकिस्तानला धक्का; दहापैकी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान २० खेळाडू आणि ११ जणांचा सपोर्ट स्टाफ आज रविवारी इंग्लंडकडे रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:23 PM

Open in App

कराची : इंग्लंड दौºयावर रवाना होण्याआधी पाक क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पीसीबीने घेतलेल्या कोरोना चाचणीत दहा खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, तर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर यापैकी एकाचा अहवाल दुसºया हॉस्पिटलमध्ये केलेल्या चाचणीत निगेटिव्ह आला. त्यात आता दहा खेळाडूंपैकी सात खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिले.

दरम्यान २० खेळाडू आणि ११ जणांचा सपोर्ट स्टाफ आज रविवारी इंग्लंडकडे रवाना होणार आहे. आधी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांना कोरोना लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. शनिवारी दहापैकी सहा खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पीसीबीचे सीइओ वसीम खान यांनी राखीव खेळाडू मोहम्मद मुसा आणि यष्टिरक्षक-फलंदाज रोहेल नझीर हे देखील निगेटिव्ह आल्याने ते संघासोबत जाणार असल्याचे सांगितले. जे दहा खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते त्यांचा अहवाल दोनवेळा निगेटिव्ह आल्यानंतरच ते इंग्लंडला जातील,असेही वसीम खान यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,‘ मोहम्मद हफीज आणि वहाब रियाज यांनी खासगी चाचणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. पीसीबीच्या धोरणानुसार मात्र पीसीबीच्या चाचणीत खेळाडू दोनवेळा निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. अशावेळी बोर्डाच्या चाचणीत ते निगेटिव्ह आढळले तरच त्यांना संघासोबत जुळता येणार आहे.’ खेळाडू मॅनचेस्टर येथे पोहोचताच १४ दिवस विलगीकरणात राहतील. 

इंग्लंडला रवाना होणारा पाकिस्तान संघअजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफिक, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मूसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी आणि यासिर शाह.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तानइंग्लंड