CoronaVirus News : विंडीज संघ विलगीकरणाबाहेर, सराव सामन्याद्वारे करणार कसोटी मालिकेची तयारी

९ जून रोजी विशेष विमानाने मॅन्चेस्टर येथे दाखल झाल्यापासून सर्व खेळाडू ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानाशेजारच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:45 PM2020-06-23T23:45:06+5:302020-06-24T07:06:14+5:30

whatsapp join usJoin us
CoronaVirus News : The West Indies will prepare for the Test series through a practice match, out of the semifinals | CoronaVirus News : विंडीज संघ विलगीकरणाबाहेर, सराव सामन्याद्वारे करणार कसोटी मालिकेची तयारी

CoronaVirus News : विंडीज संघ विलगीकरणाबाहेर, सराव सामन्याद्वारे करणार कसोटी मालिकेची तयारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : वेस्ट इंडिज संघ इंग्लंड दौऱ्यावर दाखल झाल्यानंतर सोमवारी १४ दिवसाचे विलगीकरण पूर्ण केले. आपल्याच खेळाडंूदरम्यान तीन दिवसाचा सराव सामना खेळून ते तीन कसोटी सामन्यांची तयारी करणार आहेत. ९ जून रोजी विशेष विमानाने मॅन्चेस्टर येथे दाखल झाल्यापासून सर्व खेळाडू ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानाशेजारच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.
विंडीजचा २५ सदस्यांचा संघ दौºयावर आला असून त्यात ११ राखीव खेळाडू आहेत. एखादा खेळाडू जखमी झाला किंवा कोरोनाबाधित झाला तरी त्याच्या जागी अन्य खेळाडूला संघात स्थान देता यावे यासाठी जास्तीचे खेळाडू येथे दाखल झाले आहेत.
पहिला कसोटी सामना ८ जुलैपासून खेळविला जाईल. दुसरा सामना १६ ते २० जुलै आणि तिसरा सामना २४ ते २८ जुलैदरम्यान होणार आहे. तिन्ही सामने २१ दिवसाच्या आत पूर्ण होणार आहेत. तिन्ही सामन्यांसाठी जी मैदाने निवडण्यात आली त्याशेजारी हॉटेल्सची व्यवस्था असून जैव सुरक्षित वातावरणात सामन्यांचे आयोजन होईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या बचावासाठी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही विंडीज संघातील तीन दिग्गज डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि कीमो पॉल यांनी बोर्डाकडून स्वत: निर्णय घेण्याची सूट मिळताच दौºयावर जाण्यास नकार दिला. मालिकेदरम्यान सर्व खेळाडूंना आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करता येणार नाही. याशिवाय खेळाडू आणि सहयोगी स्टाफची वारंवार कोरोना चाचणी केली जाईल. विंडीजला पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार मे ते जून या कालावधीत दौरा करायचा होता. कोरोना महामारीमुळे तो स्थगित करण्यात आला. (वृत्तसंस्था)
>वेस्ट इंडिज कसोटी संघ
जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रेग ब्रेथवेट, शमर ब्रूक्स, जॉन कम्पबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाउरिच, केमार होल्डर, शाय होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच.
राखीव खेळाडू : सुनील अंबरीश, जोशुआ डिसिल्व्हा, शेनन गॅब्रियल, कीन हार्डिंग, केली मायेर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो ंिमडले, शायनी मोसले, अ‍ॅन्डरसन फिलिप, ओशेन थॉमस आणि जोमेल वार्रिकान.

Web Title: CoronaVirus News : The West Indies will prepare for the Test series through a practice match, out of the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.