coronavirus: इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला देणार स्वत:चा वेगळा चेंडू

ईसीबीचे क्रिकेट संचालक अ‍ॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:52 AM2020-05-16T04:52:01+5:302020-05-16T04:52:25+5:30

whatsapp join usJoin us
coronavirus: England player will give his own ball | coronavirus: इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला देणार स्वत:चा वेगळा चेंडू

coronavirus: इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला देणार स्वत:चा वेगळा चेंडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी म्हणून इंग्लंड क्रिकेट संघाचा पुढील आठवड्यापासून सराव सुरू होणार आहे. सरावासाठी प्रत्येक खेळाडूला चेंडूचा वेगळा बॉक्स दिला जाईल, मात्र चेंडूवर ते लाळ लावू शकणार नाहीत. कोरोनामुळे ईसीबीने १ जुलैपर्यंत क्रिकेट स्थगित केले आहे. दरम्यान, उन्हाळ्यात क्रिकेट सुरू करण्याच्या हेतूने ३० खेळाडूंना सरावाची संधी बहाल केली.
ईसीबीचे क्रिकेट संचालक अ‍ॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ‘एक खेळाडू एक चेंडू’ हे सूत्र प्रत्येकासाठी लागू असेल. चार किंवा पाच गोलंदाजांसाठी एकच कोच देण्यात येणार आहे. सरावादरम्यान शारीरिक अंतराचे भान राखून कुठलीही वस्तू खेळाडू एकमेकांमध्ये शेअर करणार नाहीत. खेळाडू केवळ स्वत:च्या बॉक्समधील चेंडूचा वापर करू शकतील. (वृत्तसंस्था)

Web Title: coronavirus: England player will give his own ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.