खेळाडूंकडून मागितले कोरोना चाचणीचे पैसे, पीसीबीच्या निर्णयावर सारेच हैराण

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २४० खेळाडूंना कोरोना चाचणीचे पैसे जमा करण्यास सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:11 AM2020-09-16T01:11:12+5:302020-09-16T01:11:40+5:30

whatsapp join usJoin us
Corona test money demanded from players, harassment over PCB decision | खेळाडूंकडून मागितले कोरोना चाचणीचे पैसे, पीसीबीच्या निर्णयावर सारेच हैराण

खेळाडूंकडून मागितले कोरोना चाचणीचे पैसे, पीसीबीच्या निर्णयावर सारेच हैराण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : कोरोना व्हायरसचे संकट असतानादेखील अनेक देशांनी विविध क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची, तसेच खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेला घ्यावी लागते. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २४० खेळाडूंना कोरोना चाचणीचे पैसे जमा करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये या महिन्याच्या अखेरीस राष्टÑीय टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेत खेळणारे सर्व खेळाडू, अधिकारी आणि अन्य लोकांना चाचणी करावी लागणार आहे. रावळपिंडी आणि मुलतान येथे ३० सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या आधी सर्वांच्या दोन चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक केले आहे. पहिल्या चाचणीचे पैसे पीसीबी देणार असून दुसºया चाचणीचे पैसे मात्र, खेळाडू आणि अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहेत.
टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धेपाठोपाठ पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलमधील उर्वरित सामनेदेखील होणार आहेत. या स्पर्धेत विदेशी खेळाडूदेखील असल्याने पूर्ण पीसीबीला पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. परंतु, यावेळी कोरोना चाचणीसाठी विदेशी खेळाडूंकडूनदेखील चाचणीचे पैसे घेणार का, असा प्रश्न आता पीसीबीला विचारला जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Corona test money demanded from players, harassment over PCB decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.