Join us

कूल पित्याची क्यूट लेक

By admin | Updated: April 5, 2015 00:00 IST

Open in App

साक्षी धोनीने मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी मुलीचे पहिले छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तेव्हापासून या दाम्पत्याच्या गोंडस मुलीची पहिली झलक बघण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

महेंद्रसिंग धोनी व साक्षी या दोघांनी त्यांच्या मुलीचे नाव झिबा असे ठेवले असून हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा होतो.

वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यावर धोनी भारतात परतला. सुमारे दीड महिन्यांनी धोनीने त्याच्या मुलीची भेट घेतली.

महेंद्रसिंग धोनी फेब्रुवारीमध्ये वर्ल्डकपच्या तयारीत गुंतला असताना त्याची पत्नी साक्षीने गुडगावमधील खासगी रुग्णालयात एका चिमुकल्या जीवाला जन्म दिला. आपल्या मुलीला बघण्यासाठी भारतात येण्याऐवजी धोनीने वर्ल्डकपला प्राधान्य दिले.

शनिवारी रांची विमानतळावर महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षीसोबत परतला. यावेळी धोनीच्या कुशीत झिबा विसावली होती. छायाचित्रकारांना झिबाची झलक टिपता येऊ नये याची काळजी धोनी घेत होता. हे दोघेही बहुधा सुरेश रैनाच्या विवाहसोहळ्यावरुन घरी परतत होते.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता पिता झाला आहे. शनिवारी रांची विमानतळावर कूल धोनीची लाडकी लेक झिबाची पहिली झलक दिसली. पित्याच्या कुशीत कांगारु स्टाईल बॅगेत विसावलेली झिबा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.