Join us

IPL 2020: नितीश राणाच्या केकेआरसाठी एक हजार धावा पुर्ण

नितीश राणा याच्या आयपीएल कारकिर्दीला २०१५ मध्ये सुरूवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 21:54 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा याने चेन्नई सुपर किंग्ज विरोधात ६१ चेंडूत शानदार ८७ धावा फटकावल्या. या खेळीतच त्याने एक विक्रम केला आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना एक हजार धावा देखील पुर्ण केल्या आहे.

नितीश राणा याच्या आयपीएल कारकिर्दीला २०१५ मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर २०१६ मध्ये काही सामन्यात शानदार खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. तेव्हा तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मात्र २०१८ च्या सत्रात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले.त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने प्रत्येक सत्रात कोलकातासाठी शानदार खेळी केल्या आहेत.  राणा हा कोलकाताच्या टॉपआॅर्डरचामहत्त्वाचा भाग ठरला. त्याने आपल्या आजच्या खेळीतच कोलकातासाठी १००० धावा पुर्ण केल्या आहेत.

तर एकुण आयपीएलमध्ये त्याने ५९ सामन्यात १४३७ धावा केल्या आहेत. राणा हा कोलकातासाठी एक हजार धावा पुर्ण करणारा दहावा फलंदाज ठरला आहे. राणाच्या आजच्या खेळीने कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या.

या आधी यांनी केल्या आहेत केकेआरसाठी सर्वाधिक धावा

  • गौतम गंभीर ३०३५
  • रॉबिन उथप्पा २४३९
  • युसुफ पठाण १८९३
  • आंद्रे रसेल १४३४
  • जॅक कॅलीस १२९५
  • ख्रिस लीन १२७४
  • मनिष पांडे १२७०
  • सौरव गांगुली १०३१
  • मनिष तिवारी १०००२
  • नितीश राणा १०००
टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्स