Join us  

युवराज सिंह आणि कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल, भावाच्या पत्नीने केले आरोप

युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह याची पत्नी आकांक्षा शर्माने युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 2:37 PM

Open in App
ठळक मुद्देयुवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह याची पत्नी आकांक्षा शर्माने युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे. युवराजची वहिनी आकांक्षा शर्मा हीने ही तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली- युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह याची पत्नी आकांक्षा शर्माने युवराज सिंह आणि त्याच्या परिवाराविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे. युवराजची वहिनी आकांक्षा शर्मा हीने ही तक्रार दाखल केली आहे. गुरूग्राम पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच सिंह कुटुंबाला या प्रकरणी नोटीसही पाठविली आहे. याप्रकरणाची पहिली सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार असल्याचं आकांक्षाच्या वकील स्वाती मलिक यांनी सांगितलं आहे.

युवराज सिंहची आई शबनम यांनी आकांक्षाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी आकांक्षाकडून लग्नात दिलेली ज्वेलरी आणि इतर सामान परत मागितलं होतं. तक्रारीमध्ये युवराज सिंहचं नाव असण्यावर आकांक्षाच्या वकील स्वाती यांनी सांगितलं की, घरगुती हिंसाचाराचा अर्थ फक्त शारिरीक हिंसा नसते. यामध्ये मानसिक आणि आर्थिक छळ याचाही समावेश आहे. आकांक्षाबरोबर घडलेल्या घटनेच्या वेळी युवराज सिंह गप्प होता, त्यामुळे त्याचंही नाव तक्रारीत असल्याचं वकील स्वाती मलिक यांनी सांगितलं आहे. 

काही दिवसांपूर्वी युवराज सिंहची आई शबनम यांनी आकांक्षाला लग्नानंतर मुल होण्याबद्दल विचारणा केली. मात्र आकांक्षाने सध्या मुलं होऊ देण्याबद्दल आपण कोणताही विचार केला नसल्याचं समजताच, शबनम यांनी आकांक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यात युवराज सिंहनेही आपल्या आईची साथ देत, आकांक्षावर दबाव टाकल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.

युवराजचा लहान भाऊ झोरावर याने 2014मध्ये गुरगावमधील आकांक्षा शर्माशी लग्न केलं होतं. गेल्या वर्षी या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.  

टॅग्स :युवराज सिंग