Join us  

सीओएची आज महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा; कर्णधार कोहलीची विशेष विनंती

प्रशासकांची समिती बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त निवड समितीसोबत बैठकीत सहभागी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:37 AM

Open in App

नवी दिल्ली : प्रशासकांची समिती बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त निवड समितीसोबत बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये खेळाडू व निवड समितीदरम्यानचा संवादाचा मुद्दा आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम यावर प्रमुख्याने चर्चा होणार आहे.हैदराबादमध्ये होणा-या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. त्यात केंद्रीय करारात समावेश असलेल्या खेळाडूंबाबत आचारसंहिता व अतिरिक्त सपोर्ट स्टाफची गरज याचा समावेश आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेही या चर्चेचा भाग घेईल.महत्त्वाचा मुद्दा संघ व्यवस्थापन, निवड समिती व संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंसोबत संवाद हा आहे. अलीकडेच करुण नायर व मुरली विजय यांनी निवड समिती किंवा संघ व्यवस्थापनाने त्यांना संघातून वगळण्याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचे म्हटले. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद व सीओए विनोद राय यांनी मात्र आरोप फेटाळून लावला होता.निवड समितीबाबत विजय व नायर यांनी केलेले सार्वजनिक वक्तव्य हे केंद्रीय करारात समावेश असलेल्या खेळाडूंसाठी आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला जाईल. बीसीसीआयच्या मते विजयने चुकीचा मार्ग अवलंबला.’(वृत्तसंस्था)कर्णधार कोहलीची विशेष विनंतीकर्णधार कोहलीने विदेश दौ-यादरम्यान पूर्णवेळ खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या पत्नींना सोबत येण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे. यावर लगेच निर्णय होण्याची शक्यता नाही. ज़ुख्य मुद्दा आॅस्ट्रेलिया दौºयाचा आहे. यासाठी संघ व्यवस्थापनाने अतिरिक्त सराव सामन्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री