क्लार्क, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयपीएल...

आयपीएल करारावर कोणताही परिणाम न होण्याची खेळाडूंची होती इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:28 AM2020-04-11T05:28:10+5:302020-04-11T05:28:24+5:30

whatsapp join usJoin us
Clarke, Cricket Australia and IPL ... | क्लार्क, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयपीएल...

क्लार्क, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयपीएल...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext



सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे ती आॅस्टेÑलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने केलेल्या खळबळजनक वक्तव्याची. त्याने असे सांगितले की, २०१८ सालच्या दौऱ्यात आॅस्टेÑलियाने भारताविरुद्ध पराभव पत्करला, कारण त्यांनी भारताला अतिरिक्त मान दिला होता. विशेष करून विराट कोहली. कारण आयपीएल करारावर कोणताही परिणाम न होण्याची इच्छा आॅस्टेÑलियन खेळाडूंची होती. यामुळे आॅस्टेÑलिया संघाची कामगिरी साधारण झाली आणि त्यांना घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला. दखल घेण्याची बाब म्हणजे भारताचा हा विजय ऐतिहासिक विजय ठरला होता. कारण पहिल्यांदाच भारताने आॅस्टेÑलियामध्ये कसोटी विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. मात्र आता क्लार्कच्या वक्तव्याने नवा वाद उद्भवला आहे.
त्याचवेळी क्लार्कच्या या आरोपाचे आॅस्टेÑलियाचा कर्णधार टिम पेन याने खंडण करत असे काहीही झाले नसल्याचे म्हटले. पण तरी प्रश्न कायम राहतो की, खरेच आॅस्टेÑलियन खेळाडूंकडे असे झाले असेल का? कारण आॅसी खेळाडू कायमच आक्रमकतेने खेळतात. तरी माझ्या मते क्लार्कने आपले मत मांडण्याची घाई केल्याचे वाटते.
आॅस्टेÑलियन कसोटी संघावर आधारित वेब सिरिज ‘दी टेस्ट’ पाहिल्यास दिसून येईल की, या मालिकेदरम्यान आॅस्टेÑलियन डेÑसिंगरूममध्ये विराट कोहलीवर चर्चा सुरू आहे. त्याच्याकडे फारसे लक्ष देऊ नका, असा सल्लाही खेळाडूंना मिळत असल्याचे दिसते. आॅस्टेÑलियन संघाच्या योजनेचाच हा एक भाग होता. कोहलीविषयी सांगायचे झाल्यास, त्याला जितके आव्हान देऊ, तितका त्याचा खेळ अधिक बहरतो आणि याकडेच आॅसी संघाचा इशारा होता.
या मालिकेत आॅस्टेÑलियासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली चेतेश्वर पुजाराची खेळी. पुजाराचा संयम त्यांच्यासाठी परीक्षा पाहणारा
ठरला. आॅसीचे सर्वच गोलंदाज त्याच्यापुढे हतबल ठरले होते
आणि हा या मालिकेतील सर्वात
मोठा विषय होता. मात्र मायकल क्लार्कने आपले मत मांडताना पुजाराच्या खेळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
कोहलीने नक्कीच चांगली कामगिरी केली, पण पुजाराचा वाटाही नक्कीच मोठा होता. दुसरा मुद्दा म्हणजे आॅसीसाठी या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर खेळत नव्हते. त्यांच्यावर एक वर्षाची बंदी होती आणि त्यांची अनुपस्थितीही आॅसीसाठी महागडी ठरली होती.
त्यामुळे आधीच यजमानांचा संघ बॅकफूटवर होता आणि माझ्या मते क्लार्कच्या नजरेतून या गोष्टी सुटल्या आहेत.
आयपीएलमधील हित जपण्यासाठी आॅस्टेÑलियन खेळाडूंनी भारताविरुद्ध प्रयत्न केले नाहीत,
हे क्लार्कचे आरोप आॅस्टेÑलियन खेळाडूंना अपमानास्पद वाटले असणार. पण दुसरीकडे भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही.
अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत

Web Title: Clarke, Cricket Australia and IPL ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.