Join us  

प्रसाद, जोशी, शिवा यांच्यात रंगणार चुरस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीमधील दोन पदांसाठी तीन व्यक्तींना बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:09 AM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीमधील दोन पदांसाठी तीन व्यक्तींना बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, फिरकीपटू सुनील जोशी आणि समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा समावेश आहे. तसेच राजेश चौहान व हरविंदर सिंग यांनाही मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांकडून मिळाली.बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून या मुलाखतींना सुरुवात होणार असून या दोन पदांसाठी तब्बल ४४ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही समावेश होता. निवड समितीसाठी त्याला प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र त्याला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलेले नाही. तसेच माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानेही या पदासाठी अर्ज भरला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आगरकरच्या अर्जावरही विचार झाला, मात्र अखेर सीएसीने शिवा, प्रसाद, चौहान, जोशी आणि हरविंदर यांना बोलाविण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, बीसीसीआयच्या विभागीय स्तरावर निवडकर्ते म्हणूनही आगरकरसारख्या माजी खेळाडूंचा विचार होऊ शकतो.

टॅग्स :बीसीसीआय