Join us  

फक्त 116 चेंडूंत त्याने फटकावल्या 316 धावा... 34 षटकारांची केली आतषबाजी

या सामन्यात ट्रायंगल क्रिकेट क्लबने एकूण 433 धावा केल्या, यामध्ये सिल्करस्टोनच्या एकट्याच्या 316 धावा होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:30 PM

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात 316 धावांची विक्रमी खेळी खेळून सर्वांच्या लक्षात राहिला तो ख्रिश्चियन सिल्करस्टोन.

लंडन : क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते, या गोष्टीचा प्रत्यय सध्या इंग्लंडमध्ये आला आहे. कारण इंग्लंडमधील एका क्लब क्रिकेटच्या सामन्यात एका फलंदाजाने फक्त 116 चेंडूंत 316 धावांचा डोंगर उभारला आहे. या खेळीत त्याने तब्बल 34 षटकारांची आतषबाजी केली आहे.

हेलीफैक्स क्रिकेट लीग प्रीमियरमधील एका सामन्यात ट्रायंगल क्रिकेट क्लबच्या ख्रिश्चियन सिल्करस्टोनने ही धमाकेदार फलंदाजी केली आहे. हा सामना खेळला गेला तो ट्रायंगल क्रिकेट क्लब आणि थ्रॉन्टन क्रिकेट क्लब यांच्यामध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात ट्रायंगल क्रिकेट क्लबने एकूण 433 धावा केल्या, यामध्ये सिल्करस्टोनच्या एकट्याच्या 316 धावा होत्या.

ट्रायंगल क्रिकेट क्लबच्या आव्हानाचा पाठलाग करताना थ्रॉन्टन क्रिकेट क्लबला 147 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण या सामन्यात 316 धावांची विक्रमी खेळी खेळून सर्वांच्या लक्षात राहिला तो ख्रिश्चियन सिल्करस्टोन.

टॅग्स :इंग्लंड