Join us  

क्रिकेट मंडळाशी पुन्हा घेतला ख्रिस गेलने पंगा; भारताविरुद्ध खेळणार की नाही ते वाचा...

गेलने थेट वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशीच पंगा घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:54 AM

Open in App

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल हा कधी काय करेल, हे कोणाला सांगता येत नाही. काल गेलने ट्वेन्टी-२० लीगमधील संघांच्या मालकांवर गंभीर आरोप केले होते. आता तर गेलने थेट वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशीच पंगा घेतला आहे.

विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यानंतर गेलने आपण निवृत्ती घेणार, असं संकेत दिले होते. काही क्रिकेट मंडळातील लोकांनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता. भारताविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यावर गेलनेही खास सेलिब्रेशन केले होते. पण त्यानंतरही गेल खेळत राहील्याचे पाहायला मिळाले.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये गेलने खेळावे असे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाला वाटत होते. कारण गेलच्या अनुभवाचा युवा खेळाडूंना चांगला फायदा होईल आणि संघ बांधणी करता येईल, असे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाला वाटत होते. पण गेलने मात्र वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाशी पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. आपण भारताविरुद्ध खेळणार नसल्याचेच गेलने यावेळी सांगितले.

गेल म्हणाला की, " सध्याच्या घडीला मी ट्वेन्टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मी भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्येही मी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे."

ख्रिस गेलने आतापर्यंत धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावले आहे. मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यातही गेल चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. गेलने या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले. या धमाकेदार फटेबाजीनंतर गेल मैदानाबाहेरही बरसल्याचे पाहायला मिळाले आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या काही संघांवर त्याने गंभीर आरोप केले आहेत.

गेलने मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यात 27 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 54 धावा फटकावल्या. या फटकेबाजीनंतर गेल हा ट्वेन्टी-२० लीगमधील काही संघांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

इएसपीएन-क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गेल मैदानाबाहेर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर गेलने काही संघांवर गंभीर आरोपही केले आहेत.

या सामन्यानंतर गेल म्हणाला की, " जेव्हा ख्रिस गेल खेळत असतो तेव्हा त्याला डोक्यावर घेतले जाते. पण जेव्हा गेल २-३ सामन्यांमध्ये चांगली खेळी साकारत नाही तेव्हा तो संघासाठी ओझे होतो. ही गोष्ट मी या लीगमधील संघांबाबत बोलत नाही. पण गेले वर्षभर मी पाहत आलो आहे की, माझ्याबाबत या गोष्टी घडत आहे. "

टॅग्स :ख्रिस गेलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज