Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : एबी डिव्हिलियर्सनंतर आता ख्रिस गेलही IPL नाही खेळणार; जाणून घ्या त्यामागचं कारण

Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं नाव नोंदवलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:45 PM2022-01-22T12:45:08+5:302022-01-22T12:48:29+5:30

whatsapp join usJoin us
Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : No AB de villiers and chris Gayle; Why is Chris Gayle not part of IPL 2022 mega auction? | Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : एबी डिव्हिलियर्सनंतर आता ख्रिस गेलही IPL नाही खेळणार; जाणून घ्या त्यामागचं कारण

Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : एबी डिव्हिलियर्सनंतर आता ख्रिस गेलही IPL नाही खेळणार; जाणून घ्या त्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यानं नाव नोंदवलेलं नाही. १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे हा लिलाव होणार आहे. यंदापासून आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्यानं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्सख्रिस गेल हे दोन ट्वेंटी-२०चे सुपरस्टार दिसणार नाहीत. एबीनं मागच्याच महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आज गेलनंही हा निर्णय घेतल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 
 

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी ( लिलाव) १२१४ खेळाडूंनी ( ८९६ भारतीय व ३१८ परदेशी) नावं नोंदवली आहेत. यामध्ये २७० खेळाडू यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर ९०३ खेळाडू अनकॅप आणि ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेतील आहेत. पण, नोंदणी केलेल्या या खेळाडूंमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) याच्यासह मिचेल स्टार्क, सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स या स्टार्सची नावं नाहीत. त्यामुळे आयपीएल २०२२मध्ये हे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

ख्रिस गेलची आयपीएलमधील कामगिरी 
आयपीएलमध्ये ख्रिस गेल कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळला. त्यानं आयपीएलमध्ये ३९.७२च्या सरासरीनं आणि १४८.९६ स्ट्राईक रेटनं ४९६५ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय आयपीएल इतिहासात सर्वाधिक ३५७ षटकार त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर असून त्यानं २०११ व २०१२ साली RCBकडून खेळताना ऑरेंज कॅप नावावर केली होती. 


आयपीएल  २०२०मध्ये त्याला फक्त सात सामने खेळण्याची संधी मिळाली, तर आयपीएल २०२१त तो अपयशी ठरला. त्यानं १० सामन्यांत केवळ १९३ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची बॅट थंडावलेली पाहायला मिळतेय आणि वय लक्षात घेता त्यानं आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असावा. ट्वेंटी-२० क्रिकेट कारकीर्दिवर नजर टाकल्यास त्याच्या नावावर सर्वाधिक १४३२१ धावा आहेत. त्यात २२ शतकांचा समावेश आहे. 

Web Title: Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : No AB de villiers and chris Gayle; Why is Chris Gayle not part of IPL 2022 mega auction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.