Join us  

Chris Gayle : पाकिस्तानला चिअर करण्यासाठी ख्रिस गेल पोहोचला स्टेडियमवर?, विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन, Video

ख्रिस गेल नॉटिंग्हॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० लढतीत पाकिस्तान संघासाठी चिअर करताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 6:23 PM

Open in App

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. त्यानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करताना हा पराक्रम केला. ट्वेंटी-२०त गेलच्या नावावरील अनेक विक्रम हे सहजासहजी मोडणे शक्य नाही आणि त्यामुळेच त्याला युनिव्हर्स बॉस म्हणतात. पण, हाच गेल नॉटिंग्हॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० लढतीत पाकिस्तान संघासाठी चिअर करताना दिसला. पाकिस्ताननं हा सामना ३१ धावांनी जिंकल्यानंतर गेलनं स्टेडियमबाहेर भन्नाट डान्स केला. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला गेलच असल्याचा भास होईल. पण, तो गेलसारखाच दिसणारा चाहता आहे. 

पाहा व्हिडीओ... 

पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना विक्रमी ६ बाद २३२ धावांचा डोंगर उभारला. मोहम्मद रिझवान ( ६३) आणि कर्णधार बाबर आजम ( ८५) यांनी अर्धशतकी खेळी केली. फखर जमान ( २६) व मोहम्मद हाफिज ( २४) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. विराट कोहलीचा प्रतिस्पर्धी असलेल्या बाबरनं ४९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह दमदार खेळ केला.

इंग्लंडकडून लाएम लिव्हिंगस्टोननं ४३ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०३ धावा कुटल्या, परंतु ३१ धावांनी त्यांना हार मानावी लागली. जेसन रॉयनं ३२ धावा केल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत २०१ धावांत तंबूत परतला. शाहिन शाह आफ्रिदी व शाबाद खान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. ६ बाद २३२ धावा या पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावा आहे. यापूर्वी त्यांनी २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३ बाद २०५ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही प्रतिस्पर्धी संघाची तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडख्रिस गेल