Join us  

विराटच्या निवृत्तीच्या विधानावर प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे उत्तर, म्हणाले...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 140 धावांची दणदणीत खेळी करून अनेक विक्रम मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:19 AM

Open in App
ठळक मुद्दे2018 मध्ये त्याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 140 धावांची दणदणीत खेळी करून अनेक विक्रम मोडले. 'क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही वर्षंच शिल्लक आहेत. देशासाठी खेळणं ही अत्युच्च सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा खेळ फार गंभीरपणे न घेणं तुम्हाला परवडू शकत नाही. तुम्ही भारतासाठी खेळताय आणि ही संधी सगळ्यांना मिळत नाही', अशा भावना विराटने व्यक्त केल्या होत्या. 

या विधानानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या. तो लवकरच कारकिर्दीबाबत निर्णय घेईल, असे वाटू लागले आहे. मात्र, लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट इतक्यात निवृत्ती घेणार नाही आणि पुढील 10 वर्ष तरी तो क्रिकेट चाहत्यांना धमाकेदार खेळाने मनमुराद आनंद लुटण्याची संधी देईल, असे सांगितले. 

ते म्हणाले,''त्याला काही वर्ष असे म्हणायचे नव्हते. पुढील 10 वर्ष तरी तो भारतीय संघाकडून खेळणार आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत तो खेळत राहणार आहे. त्यामुळे त्याला तसे काही म्हणायचे नव्हते. आणखी 5-7 वर्ष क्रिकेट कारकिर्द राहणार असल्याचे त्याला सुचवायचे असेल.'' 

2018 मध्ये त्याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या दुखापतीने डोकं वर केलं होतं. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय