Join us  

पुजारासह पाच खेळाडूंना नोटीस; पासवर्डमध्ये गडबड झाल्याचे बीसीसीआयचे स्पष्टीकरण

जडेजा, राहुल, मानधना, शर्मा यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 2:53 AM

Open in App

नवी दिल्ली : चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुलसह पाच केंद्रीय करारबद्ध भारतीय क्रिकेटपटूंना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बीसीसीआयने उशीर होण्यासाठी ‘पासवर्डमध्ये गडबड’ झाल्याचा हवाला दिला आहे. ज्या खेळाडूंना नोटीस मिळाली आहे त्यात महिला स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांचाही समावेश आहे. त्यांचा राष्ट्रीय पंजीकृत पूल (एनआरटीपी)मध्ये समावेश ११० पैकी पाच क्रिकेटपटूंमध्ये समावेश आहे.नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी सांगितले की, बीसीसीआयने आपल्या पाच एनआरटीपी खेळाडूंना ठावठिकाणाची माहिती देण्यात अपयशी ठरण्यासाठी अधिकृत स्पष्टीकरण पाठविले आहे.अग्रवाल म्हणाले, ‘एडीएएमएस (डोपिंग विरोधी प्रशासकीय व व्यवस्थापन प्रणाली) सॉफ्टवेअरमध्ये व्हेअर अबाऊट्स फॉर्म’ भरण्याच्या दोन पद्धती आहेत. खेळाडू स्वत: हा फॉर्म भरू शकतात किंवा महासंघाने फॉर्म फिलअप करायला हवा.’ अग्रवाल पुढे म्हणाले, ‘काही खेळातील खेळाडू जास्त शिकलेले नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते. त्यामुळे त्यांना एडीएएमएसच्या या ’व्हेअरअबाऊट्स’फॉर्मचा शोध घेता येत नाही किंवा फॉर्म फिलअप करून अपलोड करता येत नाही. त्यासाठी त्यांना महासंघाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे महासंघ खेळाडूंच्या ठावठिकाण्याची माहिती फॉर्ममध्ये अपलोड करण्याची जबाबदारी स्वीकारतो.क्रिकेटपटूंनाही कधी कधी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचण भासते. क्रिकेटमध्येही हा प्रकार होता. दरम्यान, क्रिकेटपटू शिक्षित असतात आणि ते तसे करू शकतात, कदाचित त्यांच्याकडे वेळ नसावा किंवा अन्य कुठले कारण असावे. त्यामुळे संबंधित महासंघ, बीसीसीआयने खेळाडूंच्या ठावठिकाण्याची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.’ अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, ‘बीसीसीआयच्या स्पष्टीकरणावर चर्चा होईल. (वृत्तसंस्था)बीसीसीआयने यावेळी तीन महिन्यापासून माहिती का दिली नाही, याबाबत बोलताना अग्रवाल म्हणाले, ‘त्यासाठी त्यांनी स्पष्टीकरण दिले असून, ते तर्कसंगत भासत आहे, पण यावर निर्णय घेण्यात येईल. त्यांनी म्हटले आहे की, एडीएएमएसमध्ये पासवर्डबाबत गडबड झाली आहे. आता त्यांनी सांगितले की, आता हा मुद्दा निकाली निघाला आहे.’

टॅग्स :चेतेश्वर पुजारारवींद्र जडेजालोकेश राहुल