Cheteshwar Pujara : १०० वर्षांत एकाही भारतीयाला जे नाही जमले ते चेतेश्वर पुजाराने करून दाखवले; विक्रमी कामगिरी

कसोटी संघातील मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshawar Pujara) टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 03:16 PM2022-05-01T15:16:34+5:302022-05-01T17:12:05+5:30

whatsapp join usJoin us
Cheteshwar Pujara breaks 100-year-old record with brilliant double century for Sussex in County Cricket, equals Mohd Azharuddin’s 28-year-old record | Cheteshwar Pujara : १०० वर्षांत एकाही भारतीयाला जे नाही जमले ते चेतेश्वर पुजाराने करून दाखवले; विक्रमी कामगिरी

Cheteshwar Pujara : १०० वर्षांत एकाही भारतीयाला जे नाही जमले ते चेतेश्वर पुजाराने करून दाखवले; विक्रमी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कसोटी संघातील मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshawar Pujara) टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रणजी करंडक स्पर्धेत अपयश आल्यानंतर कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या पुजाराची बॅट चांगलीच तळपलीय. ससेक्स ( Sussex ) क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुजाराने पाच डावांमध्ये दोन द्विशतकं व एक शतक झळकावले आहे. शनिवारी त्याने डरहॅम ( Sussex against Durham ) विरुद्धच्या सामन्यात द्विशतकीय खेळी करून १०० वर्षांपूर्वी नवानगरचे महाराजा रंजितसिंहजी यांचा विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ द्विशतकं झळकावणारा पुजार हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. 

ससेक्स क्लबकडून ( Sussex ) खेळणाऱ्या पुजाराने कौंटी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात द्विशतक ( २०१* वि. डर्बीशायर), दुसऱ्या सामन्यात शतक ( १०९ वि. वॉर्करशायर) झळकावल्यानंतर त्याने शनिवारी डरहॅम ( DURHAM  ) विरुद्ध द्विशतकी खेळी केली. ३४ वर्षीय पुजाराने ३३४ चेंडूंत ६०.७७च्या सरासरीने २४ चौकारांसह २०३ धावा केल्या. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर ससेक्सने पहिल्या डावात ५३८ धावांचा डोंगर उभा करून ३१५ धावांची आघाडी घेतली.  

डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळल्यानंतर ससेक्सचा संघ मैदानावर उतरला. कर्णधार टॉम हैनेस ( ५४) व टॉम अल्सोप ( ६६) यांनी डाव सावरला. ही दोघंही माघारी परतल्यानंतर पुजारा नांगर रोवून उभा राहिला. त्याला टॉम क्लार्कची ( ५०) सुरेख साथ मिळाली. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि पुजारा या जोडीनं कमाल केली.  या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावा जोडल्या. रिझवान ७९ धावांवर माघारी परतला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ द्विशतकांचा विक्रम कुमार श्री रणजितसिंहजी यांनी सर्वात आधी नोंदवला. त्यानंतर पुजाराने ही कामगिरी केली. २००८-०९ मध्ये सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने ओदिशाविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. त्याने सौराष्ट्र, भारत A, भारत ब्लू आणि भारतीय संघांकडून एकूण १३ द्विशतकं झळकावली आहेत. त्यात आता कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन द्विशतकांचा समावेश झाला आहे.      

या द्विशतकासह पुजाराने २८ वर्षांपूर्वी मोहम्मद अझरूद्दीनने नोंदवलेल्या विक्रमाची बरोबरी केली. कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन द्विशतकं झळकावणारा पुजारा हा अझरूद्दीननंतर दुसरा भारतीय ठरला. अझरुद्दीनने डर्बीशायरकडून खेळताना १९९१ मध्ये लिचेस्टरशायरविरुद्ध २१२ व १९९४ मध्ये डरहॅमविरुद्ध २०५ धावा केल्या होत्या. 

Web Title: Cheteshwar Pujara breaks 100-year-old record with brilliant double century for Sussex in County Cricket, equals Mohd Azharuddin’s 28-year-old record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.