Join us

चेन्नईचा सोपा विजय, रवींद्र जडेजाची निर्णायक गोलंदाजी

रवींद्र जडेजा आणि हरभजनसिंग यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने एमसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयपीएल लढतीत रॉयल चॅलेंजर बँगलोरवर संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईने गुणतालिकेत १० सामन्यात १४ गुणांसह अापले स्थान भक्कम केले आहे तर दुसरीकडे प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक असताना आजच्या पराभवामुळे आरसीबीच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:20 IST

Open in App

- जयंत कुलकर्णीपुणे - रवींद्र जडेजा आणि हरभजनसिंग यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने एमसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयपीएल लढतीत रॉयल चॅलेंजर बँगलोरवर संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईने गुणतालिकेत १० सामन्यात १४ गुणांसह अापले स्थान भक्कम केले आहे तर दुसरीकडे प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक असताना आजच्या पराभवामुळे आरसीबीच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आरसीबीचे ९ सामन्यात फक्त ६ गुण आहेत.चेन्नई सुपरकिंग्जने विजयाचे १२८ धावांचे लक्ष्य १८ षटकात ४ गडी गमावून गाठले. चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनीने २३ चेंडूत १ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३१, अम्बाती रायुडूने २५ चेंडूत ३ चौकार व २ षटकारासह ३२ आणि सुरेश रैनाने २१ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह २५ धावा केल्या.विजयासाठी पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जने पॉवरप्लेमध्ये ४२ धावा केल्या. शेन वॉटसनच्या रूपाने पहिला धक्का बसल्यानंतर अम्बाती रायुडू याने सुरेश रैनाच्या साथीने चेन्नईचे धावांचे अर्धशतक ६.५ षटकात पूर्ण केले. रायुडूने टीम साऊथीचा समाचार घेताना दोन चौकार आणि मिडविकेटला खणखणीत षटकार ठोकला तर रैनाने लाँगआॅनला षटकार ठोकला. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ३४ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी करीत चेन्नईच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. उमेश यादवने सुरेश रैनाला साउथीकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. चेन्नईच्या १० षटकात २ बाद ७१ धावा धावफलकावर होत्या. कॉलिन ग्रँडहोमला सणसणीत पूलचा चौकार मारणाºया अम्बाती रायुडूला मृगन अश्विनने सिराजकरवी झेलबाद करीत चेन्नईला तिसरा धक्का दिला. त्यानंतर चहलला एकाच षटकात तीन षटकार ठोकणाºया कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन ब्राव्हो ३४ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी करीत सुपरकिंग्जच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी, चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला २० षटकात ९ बाद १२७ धावांत रोखले. आरसीबीकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक ४१ चेंडूत ५ चौकार व २ षटकारासह ५३ आणि टीम साऊथी याने २६ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. या दोघांशिवाय आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकला नाही. चेन्नई सुपरकिंग्जकडून रवींद्र जडेजाने १८ धावांत ३ व हरभजनसिंगने २२ धावांत २ गडी बाद केले. ब्रॅण्डन मॅक्युलम (५), विराट कोहली (८), ए बी डिव्हिलियर्स (१) आणि मनदीपसिंग (८) यांना तंबूत पाठविले.धाडताना आरसीबीच्या मोठी धावसंख्या रचून सामना जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरले. विशेष म्हणजे आरसीबीकडून एकाकी झुंज देणारा पार्थिव पटेल (५३) याने कर्णधार विराट कोहलीसोबत २९ चेंडूंत केलेली ३८ धावांची ही आरसीबीकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली. वेगवान गोलंदाज एनगिडी याने त्याच्या पहिल्याच षटकात धोकादायक ब्रॅण्डन मॅक्युलमला मिडआॅनला शार्दुल ठाकूर याच्या हाती झेल देण्यास भाग पाडत पहिले यश मिळवून दिले; परंतु याच षटकात पार्थिव पटेलने लाँगआॅन आणि मिडविकेटवर चौकार मारत एनगिडीचा समाचार घेतला. पार्थिवने त्यानंतर डेव्हिड विले याला डावाच्या तिसºया षटकात लाँगआॅनवर षटकार मारत त्याचा समाचार घेतला. विराट कोहली याने त्याचा पहिला चौकार शार्दुल ठाकूरला लॉफ्डेड आॅनड्रार्इंव्ह मारत मारला. पार्थिव पटेल याने एनगिडी मिडविकेटवर षटकार आणि कव्हर खणखणीत कव्हर ड्राइव्हचा चौकार मारत रॉयल चँलेंजर्सला ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ४७ पर्यंत मजल मारुन दिली; परंतु चेन्नईने १0 धावांच्या अंतरातच आरसीबीला दोन जबरदस्त धक्के देताना त्यांना बॅकफूटवर ढकलले. सर्वात प्रथम रवींद्र जडेजाने कर्णधार विराट कोहली (८) याला त्रिफळाबाद आणि त्यानंतर हरभजनसिंग याने अ‍ॅबी डिव्हिलियर्स धोनीकरवी यष्टिचीत केले. पहिल्या तीन जोरदार धक्क्यामुळे १0 षटकात आरसीबीला ६८ धावापर्यंत मजल मारता आली. त्यातच जडेजाला स्विप मारण्याच्या प्रयत्नात मनदीपसिंग बॅकवर्ड स्क्वेअरलेगला विलेच्या हातात झेल देऊन बाद झाल्यामुळे आरसीबीचा संघ आणखीनच संकटात सापडला. दरम्यान हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर मिडविकेटवर एकेरी धाव घेत पार्थिव पटेलने ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. तथापि, जडेजाने पार्थिव पटेलला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत तंबूत धडाताना आरसीबीची स्थिती १२.५ षटकांत ५ बाद ८४ अशी केली. त्यानंतर १९ व्या षटकात ब्राव्होला मिडविकेटवर षटकार ठोकणाºया टीम साऊथीमुळे रॉयल चँलेंजर्स बँगलोरला १२७ पर्यंत मजल मारता आली.संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर :२0 षटकात : ९ बाद १२७. (पार्थिव पटेल ५३, टीम साऊथी ३६. रवींद्र जडेजा ३/१८, हरभजनसिंग २/२२, विले १/२४, एनगिडी १/२४)चेन्नई सुपर किंग्ज : १८ षटकात ४ बाद १२८. (अम्बाती रायुडू ३२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३१, सुरेश रैना २५, उमेश यादव २/१५,ग्रँडहोम १/१६).

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2018क्रिकेट