Join us  

चेन्नई सुपर किंग्ससोबतचा हरभजन सिंगचा प्रवास संपला; रिटेशनच्या डेड लाईनपूर्वी घोषणा

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 1:04 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. २0  जानेवारी पर्यंतची मुदत त्यांना देण्यात आली होती. पुढील महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. यापैकी सर्वात जास्त लक्ष असेल ते चेन्नई सुपर किंग्सकडे ( Chennai Super Kings)... महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) या संघाला आयपीएल २०२०मध्ये साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच धोनीचा CSK संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे या संघात बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. IPL 2021 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार?; मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणानं चक्र फिरणार

आयपीएल २०२१साठी प्रत्येक फ्रँचायझी संघात बदल करणार आहेत. त्यासाठी हे मिनी ऑक्शन घेण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) खात्यात  सर्वात कमी १५ लाख रुपये शिल्लक आहेत. आपल्या खात्यातील रक्कम वाढवण्यासाठी चेन्नई केदार जाधव, पियुष चावला या दोन खेळाडूंना रिलिज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, CSKनं बुधवारी फिरकीपटू हरभजन सिंगला ( Harbhajan Singh) रिलीज केले. भज्जीनं वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२०मधून माघार घेतली होती. २०१८साली भज्जी CSKच्या चमूत दाखल झाला.  फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम! 

बुधवारी भज्जीनं पोस्ट लिहून CSKसोबतचा प्रवास संपल्याची जाहीर केले. मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला २०१८मध्ये चेन्नईनं करारबद्ध केलं होतं. त्याच्या अनुभवाच्या जोरावर चेन्नईनं २०१८मध्ये ट्रॉफी जिंकली आणि २०१९मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. ''चेन्नई सुपर किंग्ससोबतचा माझा करार संपला आहे. या संघाकडून खेळण्याचा अनुभव चांगला होता. सुंदर क्षण आणि काही चांगले मित्र मला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापन, स्टाफ आणि चाहते या सर्वांचे आभार. ऑल दी बेस्ट,''अशी भज्जीनं पोस्ट लिहीली.  IPL 2021त महेंद्रसिंग धोनी होणार मालामाल, IPLमध्ये १५० कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू; जाणून घ्या रोहित, विराटचा पगार!  

भज्जीनं २०१८ न २०१९ च्या पर्वात चेन्नईसाठी ७ व १९ विकेट्स घेतल्या. त्यानं एकूण १६० आयपीएल सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्सहरभजन सिंग