Moeen Ali: ६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला, Video

IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनआधी लिलावात सहभागी झालेले सर्वच खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:59 PM2022-02-11T15:59:31+5:302022-02-11T16:00:12+5:30

whatsapp join usJoin us
Chennai Super Kings all rounder Moeen Ali scores a terrific 75 off 35 balls in the BPL 2022, hitting 9 sixes along the way, Watch video | Moeen Ali: ६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला, Video

Moeen Ali: ६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनआधी लिलावात सहभागी झालेले सर्वच खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. इंग्लंडचा जेसन रॉय व  सिंगापूरचा टीम डेव्हिड पाकिस्तान सुपर लीगमध्ये फटकेबाजी करताना दिसत आहेत, तर आंद्रे रसेल, मोईन अली हे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. पण, चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) संघात कायम राखलेला मोईन अली ( Moeen Ali) भलताच सुटला आहे. महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतोय आणि याची प्रचिती बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात आली.

कोमिला व्हिक्टोरियन्स ( Comilla Victorians) संघाचे प्रतिनिधित्व करताना मोईन अलीने तुफान फटकेबाजी केली. लिटन दास व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या फटकेबाजीनंतर मोईन अलीची बॅट तळपली. खुल्ना टायगर्सविरुद्धच्या ( Khulna Tigers) सामन्यात लिटन दासने १७ चेंडूंत ४ चौकार ३ षटकारांसह ४१, तर ड्यू प्लेसिसने ३८ धावा केल्या. त्यानंतर मोईन अलीने दमदार खेळ केला. त्याने ३५ चेंडूंत १ चौकार व ९ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना त्याने ८ षटकार खेचले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर व्हिक्टोरियन्सने     ६ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टायगर्सचे ६ फलंदाज ६८ धावांवर माघारी परतले. 


चेन्नई सुपर किंग्सने  IPL 2022 साठी रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी) यांना आपल्या ताफ्यात कायम राखले आहे. त्यांना आता लिलावात ४८ कोटींत २१ खेळाडूंना करारबद्ध करायचे आहे. 

Web Title: Chennai Super Kings all rounder Moeen Ali scores a terrific 75 off 35 balls in the BPL 2022, hitting 9 sixes along the way, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.