चेन्नई की मुंबई?...अंतिम सामना आज, चौथ्यांदा जेतेपद कोणाकडे?

आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 05:21 AM2019-05-12T05:21:59+5:302019-05-12T09:39:29+5:30

whatsapp join usJoin us
Chennai & Mumbai? ... the final match today, fourth title? | चेन्नई की मुंबई?...अंतिम सामना आज, चौथ्यांदा जेतेपद कोणाकडे?

चेन्नई की मुंबई?...अंतिम सामना आज, चौथ्यांदा जेतेपद कोणाकडे?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे.
मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये दाखल होण्याच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश होता. स्पर्धेच्या या टप्प्यात त्यांनी तीनवेळा चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे. त्यात मंगळवारी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायरचाही समावेश आहे.
दरम्यान, आकडेवारीचा विचार केला तर कुणाला पसंती दर्शविता येत नाही. कारण दोन्ही संघ अनेकदा फायनलमध्ये पोहोचलेले असून, अनेकदा जेतेपदही पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने आतापर्यंत चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात तीनवेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यापैकी दोनदा २०१३ व २०१५ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता तीनवेळा जेतेपद पटकावणाºया चेन्नई सुपरकिंग्सने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यांच्यासाठी यंदाचे सत्र शानदार ठरले. विशेषत: गेल्यावर्षी दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करीत जेतेपद पटकावले होते. चेन्नईला अंतिम लढतीपूर्वी आपली रणनीती योग्यपद्धतीने तयार करावी लागेल. कारण यंदाच्या मोसमात मुंबई संघाने त्यांचा तीनवेळा पराभव केलेला आहे. रोहित अ‍ॅन्ड कंपनीला चेन्नईच्या फिरकीपटूंना समर्थपणे तोंड द्यावे लागले.
मुंबई संघाला चार दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळली. आता हा संघ धोनीच्या संघाविरुद्ध यंदाच्या मोसमातील चौथा विजय व आयपीएलमध्ये चौथे विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. आयपीएल स्पर्धेनंतर विश्वकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. आॅस्ट्रेलियातर्फे निलंबित करण्यात आलेले स्टार स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली. चेंडू छेडछाड प्रकरणात वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले. वॉर्नरने आयपीएलमध्ये
६९२ धावा केल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू आहे. जॉनी बेयरस्टॉसोबतची त्याची जोडी यशस्वी ठरली.





वादाचीही किनार
स्पर्धेदरम्यान मैदानात अनेक वादही झाले. त्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन व चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांचे वाद महत्त्वाचे ठरले. अश्विनने जोस बटलरला धावबाद करीत क्रिकेट जगतात खिलाडूवृत्तीचा वाद निर्माण केला. काहींनी अश्विनचे समर्थ केले, तर काहीनी त्याला विरोध दर्शविला. या वादात एमसीसीने आपल्याकडे लक्ष वेधले.
दोन आठवड्यांनंतर धोनीच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तो नो-बॉलच्या निर्णयवार डगआऊटमधून बाहेर येत पंचांपर्यंत पोहोचला. त्याला स्वत:वर नियंत्रण राखता आले नाही. पंचांनीही बरेच चुकीचे निर्णय दिले. त्यात भारतीय पंचांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

पंडया, राहुलचे पुनरागमन
भारतीय संघासाठी हार्दिक पंड?ा व केएल राहुल यांचे फॉर्ममध्ये परतणे लक्षवेधी ठरले. वर्ल्डकपच्या पाश्वर्भूमीवर खेळाडू फॉर्ममध्ये असणे भारतीय संघासाठी अर्थातच विशेष महत्त्वाचे असणार आहे. पंड्या व राहुल यापूर्वी खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात केलेल्या अश्लील टिपणीमुळे वादात सापडले, त्यांच्यावर कारवाईही झाली. पण, त्यानंतर आपण आपल्या प्रँचायझी संघासाठी मॅचविनर असल्याचे अधोरेखित करण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु राहिला.

धोनीची कृती अनपेक्षित
मैदानाबाहेर असलेल्या धोनीने पंचांना जाब विचारण्यासाठी थेट मैदानात येणे अतिशय आश्चर्याचे ठरले. धोनीचा तोल ढळण्याची ही घटना अतिशय धक्कादायक ठरली. याशिवाय, खराब पंचगिरी या मोसमाला गालबोट लावणारे ठरले.

आजची लढत रंगतदार
अंतिम फेरीत चेन्नई व मुंबईचे संघ यंदाच्या जेतेपदासाठी निर्धाराने मैदानात उतरतील. इम्रान ताहीर, हरभजन सिंग व रविंद्र जडेजा या त्रिकुटाने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले असले तरी मुंबई इंडियन्सनी या तिघांचा यशस्वीरित्या सामना केला आहे. त्या पाश्वर्भूमीवर आजची लढत विशेष रंगतदार ठरु शकते.




संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्स :
महेंद्रसिंग धोनी (कणर्धार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कगलेईन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कणर्धार), क्विन्टॉन डी कॉक, सुयर्कुमार यादव, युवराज सिंग, केरॉन पोलार्ड, हार्दिक पंडया, कृणाल पंडया, मिशेल मॅकक्लॅघन, मायंक मार्कंडे, राहुल चहर, जसप्रित बुमराह, अनमोलप्रित सिंग, सिद्धेश लाड, अंकुल रॉय, इव्हिन लुईस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन, आदित्य तरे, रसिक सलाम, बरिंदर सरण, जयंत यादव, ब्यूरन हेन्ड्रिक्स, मलिंगा.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.

Web Title: Chennai & Mumbai? ... the final match today, fourth title?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.