Join us  

... तर ख्रिस गेलवर कारवाई करणार, क्रिकेट मंडळाची धमकी

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:21 PM

Open in App

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा त्यानं निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं चुप्पी साधली असली तर ट्वेंटी-20 लीगमधील फ्रँचायझीनं गेलवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमधील चत्तोग्राम चॅलेंजर्स संघानं गेलला करारबद्ध केले आहे आणि या लीगमध्ये न खेळल्यास गेलवर कारवाई करण्यात येईल, असं बांगलादेश क्रिकेट मंडळानं स्पष्ट केलं. 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 डिसेंबरला सुरुवात होणार आहे आणि विंडीज मंडळानं शुक्रवारी मालिकेसाठी संघ जाहीर केला. तत्पूर्वीच गेलनं या मालिकेत न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात बिग बॅश लीगमध्येही न खेळण्याचा निर्णय गेलनं सांगितला. गेलच्या या निर्णयानंतर चॅलेंजर्स संघाकडून हा निर्णय आला. दक्षिण आफ्रिकेतील मॅझन्सी सुपर लीगमधील जोझी स्टार्सकडून खेळलेल्या अखेरच्या सामन्यानंतर गेलनं विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली. 

या सामन्यानंतर गेल म्हणाला की, " जेव्हा ख्रिस गेल खेळत असतो तेव्हा त्याला डोक्यावर घेतले जाते. पण जेव्हा गेल २-३ सामन्यांमध्ये चांगली खेळी साकारत नाही तेव्हा तो संघासाठी ओझे होतो. ही गोष्ट मी या लीगमधील संघांबाबत बोलत नाही. पण गेले वर्षभर मी पाहत आलो आहे की, माझ्याबाबत या गोष्टी घडत आहे. "

बांगलादेश प्रीमिअर लीग 11 डिसेंबरपासून सुरू होत आहे. चॅलेंजर्स संघाचे व्यवस्थापक जलाल युनूस यांनी सांगितले की,''ख्रिस गेलला या कारवाईची कल्पना आहे, असे त्याच्या एजंटनं सांगितलं. तो आला नाही, तर आम्ही दुसऱ्या परदेशी खेळाडूचा विचार करू. पण, लीगची शिस्त कायम राहण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळानं त्याच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.'' 

टॅग्स :ख्रिस गेलभारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिजबांगलादेश