वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली

‘भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वाढत्या वयामुळे संघाच्या थिंक टँकने भविष्यात वेगवान गोलंदाजांची नवी पिढी तयार करण्याची गरज ओळखली आहे,’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:07 IST2020-03-04T04:07:14+5:302020-03-04T04:07:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Changes need to be made in fast bowlers - Kohli | वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली

वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली

ख्राईस्टचर्च : ‘भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वाढत्या वयामुळे संघाच्या थिंक टँकने भविष्यात वेगवान गोलंदाजांची नवी पिढी तयार करण्याची गरज ओळखली आहे,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. जसप्रीत बुमराह अनेक वर्षे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची आशा आहे, पण ३२ वर्षांचा होणारा ईशांत व २९ वर्षांचा मोहम्मद शमी यांनी यापूर्वीच सर्वोच्च पातळी गाठली असून उमेश यादव यंदा ३३ वर्षांचा होईल.
कोहली म्हणाला, ‘हे खेळाडू आता युवा होणार नाहीत आणि भविष्यात आम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. या खेळाडूंचे स्थान घेणारे खेळाडू आमच्याकडे असावे त्यादृष्टीने योजना आखावी लागेल.’ गेल्या दोन वर्षांत शमीवरील भाराचा विचार करता कदाचित आगामी दोन वर्षांत संघाला वेगवान गोलंदाजीत बदल करण्यास सज्ज व्हावे लागेल.
नव्या गुणवत्तेवर लक्ष देण्याचे संकेत देताना कोहली म्हणाला, ‘भविष्यातील संभाव्य तीन-चार खेळाडूंचा शोध घेणे आवश्यक आहे. अचानक कुणी बाहेर झाले, तर त्याची उणीव भासायला नको. त्याचे स्थान घेणारा दुसरा खेळाडू सज्ज असायला पाहिजे. क्रिकेटमध्ये वेळोवेळी छोट्या बदलाला सामोरे जावे लागते.’

>सैनी व्यतिरिक्त अन्य खेळाडूंवरही नजर
कर्णधार म्हणाला,‘नवदीप सैनी यापूर्वीपासून संघाचा भाग आहे तर अन्य दोन-तीन खेळाडू आहेत जे या योजनेचा भाग आहेत. सैनीव्यतिरिक्त अन्य दोन-तीन खेळाडूंवर आमची नजर आहे. आम्हाला सावधगिरी बाळगावी लागले. वेगवान गोलंदाजांनी आम्हाला यश मिळवून दिले असून हा स्तर कायम राहावा, हे आम्हाला निश्चित करावे लागेल.’

Web Title: Changes need to be made in fast bowlers - Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.