Join us

CSK vs KKR Latest News: KKR समोर स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान; CSKला पराभवाची पतफेड करण्याची संधी

आज केकेआरला स्पेर्धेत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे.

By मुकेश चव्हाण | Updated: October 29, 2020 15:38 IST

Open in App

दुबई : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) उर्वरित संघांचे समीकरण बिघडविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचे पहिले लक्ष्य विजयासाठी आतुर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असेले आज उभय संघांदरम्यान लढत होणार आहे. 

आज केकेआरला स्पेर्धेत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे. तसेच पहिल्या फेरीत केकेआरने सीएसकेला पराभूत केले होते. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याची संधा आज सीएसकेसमोर असणार आहे.  केकेआरच्या खात्यावर १२ सामन्यांत १२ गुणांची नोंद आहे. त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. चेन्नई आठ संघांच्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. हा संघ आता प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

स्पर्धेच्या या टप्प्यात काही संघांच्या जय-पराजयामुळे काही संघ १४ किंवा १६ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. अशा स्थितीत सरस नेटरनरेटच्या आधारावर प्ले-ऑफचे स्थान निश्चित होईल. अशा स्थितीत केकेआरसाठी मोठ्या फरकाने विजय मिळविणे महत्त्वाचे ठरेल. केकेआरसाठी चेन्नईविरुद्धची लढत सोपी राहणार नाही. चेन्नईने गेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ८ गडी राखून पराभव केला होता.  

मजबूत बाजू 

चेन्नई- धोनीचे कल्पक नेतृत्व. प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेल्यामुळे दडपण नाही. फाफ ड्यूप्लेसिस शानदार फॉर्मात. सँटनरच्या समावेशामुळे गोलंदाजी मजबूत.

केकेआर- गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा शानदार फॉर्म. 

कमजोर बाजू 

चेन्नई - आघाडीच्या फळीसह मधली फळीही अपयशी.  लौकिकाला साजेसे क्षेत्ररक्षण करण्यात अपयश. गोलंदाजांनाही अपेक्षित कामिगरी करता आलेली नाही.

केकेआर- फलंदाजी क्रम चिंतेचा विषय. राहुल त्रिपाठी,  नितीश राणाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स