केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील खेळपट्ट्यांवर अतिरिक्त उसळी मिळणे चांगला बदल ठरेल. परंतु, तेथे लाल कूकाबूरा चेंडूने गोलंदाजी करणे आव्हानात्मक असेल,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केले.दक्षिण आफ्रिकेतील वातावरणात दीर्घ पल्ल्याचा मारा करण्यावर भारतीय वेगवान गोलंदाजांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सराव सत्रानंतर भुवनेश्वरने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘जेव्हा कधी दक्षिण आफ्रिकेचा दौरा येतो, तेव्हा सर्वप्रथम उसळणाºया खेळपट्ट्या डोळ्यांसमोर येतात. अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांना उसळणाºया चेंडूंना सामोरे जाणे खूप महत्त्वपूर्ण ठरते. त्याचवेळी, गोलंदाजांसाठीही ही महत्त्वाचे असते. कूकाबूरा चेंडूने मारा करणे सर्वात कठिण आहे. २५-३० षटकांनंतर या चेंडूने फारकाही करता येत नाही, त्यामुळेच याप्रकारच्या परिस्थितीनुसार आम्ही तयारी करत आहोत.’भुवी म्हणाला की, ‘आम्ही अजून योजनांविषयी चर्चा केली नाही. आमचे लक्ष केवळ मूलभूत गोष्टींकडे लागले आहे. कदाचित पहिल्या कसोटीच्या दोन दिवसआधी आम्ही योजनांवर चर्चा करु. फलंदाजांनुसार रणनिती आखण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कूकाबूरा चेंडूने मारा करणे आव्हानात्मक - भुवनेश्वर
कूकाबूरा चेंडूने मारा करणे आव्हानात्मक - भुवनेश्वर
दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील खेळपट्ट्यांवर अतिरिक्त उसळी मिळणे चांगला बदल ठरेल. परंतु, तेथे लाल कूकाबूरा चेंडूने गोलंदाजी करणे आव्हानात्मक असेल,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:06 IST