Join us  

IND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण? कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:30 PM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीकडे भारताचे कर्णधारपद असले तरी पडद्यामागे कर्णधाराची भूमिका महेंद्रसिंग धोनी बजावत आहे.

विशाखापट्टण, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ विकेट्सने सहज जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले.

सध्या भारतीय संघात दोन कर्णधार आहेत, असे म्हटले जात. विराट कोहलीकडे भारताचे कर्णधारपद असले तरी पडद्यामागे कर्णधाराची भूमिका महेंद्रसिंग धोनी बजावत आहे. जेव्हा सामन्यात अटीतटीची परिस्थिती येते, तेव्हा कोहली अधिक आक्रमक होतो. पण धोनी मात्र शांत चित्ताने परिस्थिती योग्यपद्धतीने हाताळताना दिसतो.

भारतीय संघातील बरेच युवा खेळाडू चांगली कामगिरी झाल्यावर धोनीचेच नाव घेतता. कर्णधार कोहली असला तरी धोनीच संघाचा मुख्य सूत्रधार असल्याचे  पाहायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी धोनीने असे काही केले की, चाहते त्यालाच कर्णधार म्हणायला लागले.

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सराव करत होता. धोनीही संघाबरोबर सराव करत होता. पण सराव झाल्यावर धोनी वळला तो खेळपट्टीकडे. धोनी खेळपट्टीजवळ गेला. त्याने खेळपट्टीचा पोत बघितला. ही खेळपट्टी कोणत्या गोष्टीसाठी फायदेशीर होऊ शकते, हे धोनीने पाहिले. हे खरे तर कर्णधाराचे काम. पण धोनीने हे काम केले. त्यामुळे चाहत्यांनी 'कर्णधार असावा तर असा' असे म्हणायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीविराट कोहलीबीसीसीआय