Join us  

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला कॅप्टन कोहली, 14.5 कोटी घेणाऱ्या बेन स्टोक्सला टाकलं मागे

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 10:54 AM

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. विराट कोहली आयपीएलचे सामने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातून खेळतो.  रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहलीला आयपीएलसाठी 17 कोटी रूपये दिले आहेत. आयपीएल 2018च्या रिटेन डेडलाइन वर आरसीबीने कॅप्टन कोहलीला टीममध्ये कायम ठेवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. आरसीबीसोबत खेळायचे 17 कोटी रूपये घेऊन विराट कोहलीने रायसिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकलं आहे. विराट कोहलीला 17 कोटी रूपये देऊन रिटेन करण्यात आलं आहे. बेन स्टोक्सला मागे टाकण्यात विराट कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्र सिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा सहभाग आहे. धोनी व रोहित शर्माला त्यांच्या टीमने 15 कोटी रूपयात रिटेन केलं आहे. 

खेळाडूंना रिटेन करण्यावरून बरिच चर्चा होती, पण ज्या खेळाडुंची जास्त चर्चा होती त्याच खेळाडूंना टीम्समध्ये घेण्यात आलं आहे. सर्व आपीएल संघांनी २०१८च्या नव्या सीझनसाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खेळाडूंची ही यादी जाहीर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.

आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतलं आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवलं आहे.

चेन्नई, बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आठही संघांनी कायम ठेवलेले खेळाडू

- रॉयल चॅलेंजर्स  बंगलोर : विराट कोहली, ए. बी. डिविलियर्स, सरफराज खान- चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा- मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या- दिल्ली डेयरडेविल्स : क्रिस मॉरिस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर- कोलकाता नाइटराइडर्स : सुनील नरेन, आंद्रे रसेल- सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार- राजस्थान रॉयल्स : स्टीव स्मिथ- किंग्स इलेवन पंजाब : अक्षर पटेल 

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली