Join us  

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यासाठी खूशखबर, 'कॅप्टन कूल'चे भारतीय संघात पुनरागमन निश्चित!

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:45 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन, तर न्यूझीलंडविरुद्ध पाच वन डे सामन्यांची मालिकामहेंद्रसिंग धोनी ऑक्टोबरनंतर भारतीय संघात कमबॅक करणार

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) लवकरच संघाची घोषणा करणार आहे. या मालिकेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

2019च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता मागील काही महिन्यांत भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. त्यामुळे धोनीला काही मालिकेत विश्रांतीही देण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात धोनी अखेरचा खेळला होता. मात्र, त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्याला 2018 मध्ये 13 डावांत 25च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. पदार्पणानंतरची त्याची ही सर्वा निच्चांक कामगिरी आहे. मागील सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अनुक्रमे 23, 7, 20, 36, 8, 33 व 0 धावा केल्या. 

मात्र, धोनीने वन डे क्रिकेटमध्ये यष्टिमागे दिलेले योगदान हे महत्त्वाचे आहे. त्याचे संघात असणे हे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे आणि कर्णधार विराट कोहलीलाही कोणताही निर्णय घेताना त्याची फार मदत होते. संघाचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यापूर्वी 2019च्या विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीच पहिली पसंती असेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यालीत वन डे मालिकेत धोनीला संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही धोनी संघाचा सदस्य असणार आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत धोनीला वगळून रिषभ पंतला संधी देण्यात आली होती.

वन डे मालिकेचे वेळापत्रकऑस्ट्रेलियाः 12 जानेवारी ( सिडनी), 15 जानेवारी ( अॅडलेड) आणि 18 जानेवारी (मेलबर्न)न्यूझीलंडः 23 जानेवारी, 26 जानेवारी, 28 जानेवारी, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारीन्यूझीलंड ( ट्वेंटी-20 मालिका) : 6 , 8 व 10 फेब्रुवारी.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया