Join us  

महापराक्रमी 'विराटसेने'ची २०१९ मध्ये अग्निपरीक्षा, जग जिंकण्याचं आव्हान!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा आणि शतकांचा पाऊस पाडणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 हे वर्ष अविस्मरणीय राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 11:28 AM

Open in App
ठळक मुद्देवर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीच्या कामगिरीवर लक्षकपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकलाय वर्ल्ड कपसर्वाधिव पाच वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या नावावर

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा आणि शतकांचा पाऊस पाडणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 हे वर्ष अविस्मरणीय राहिले. नवीन वर्ष हे नव्या आव्हानांसह त्याची प्रतीक्षा करत आहे. सध्याच्या घडीला कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि कर्णधार म्हणूनही त्याने छाप पाडली आहे. 2019 मध्ये कोहलीच्या नेतृत्वशैलीची अग्निपरीक्षाच आहे आणि त्याला एक महान फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधीही आहे.

या वर्षात कोहलीसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे इंग्लंडमध्ये होणारा वन डे क्रिकेट वर्ल्ड कप... कोहलीच्या नेतृत्वाची खरी कसोटी या स्पर्धेत लागणार आहे. 2019 हे वर्ष कोहलीच्या नेतृत्वाची दिशा ठरवणारे ठरणार आहे. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावण्याची कोहलीला संधी आहे. कपिल देव यांनी 1983 मध्ये भारताला प्रथम वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यानंतर 28 वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा पराक्रम केला. आता 8 वर्षांनी कोहलीच्या खांद्यावर भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याची जबाबदारी आहे. 

कोहलीने 2008 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता आणि त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे आणि त्याला वरिष्ठ संघालाही हे जेतेपद जिंकून देण्याची संधी आहे. हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे आणि इंग्लंडमध्ये कोहलीच्या बॅटीतून धावांचा धबधबा वाहला आहे. भारतीय संघाने 2017 मध्ये येथेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी भारत उपविजेतेपदावर समाधान मानण्याच्या मानसिकतेत नक्कीच नसेल. 

30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय संघ संतुलित दिसत असता तरी त्यांच्यासमोर यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या तगड्या संघांचे आव्हान आहे. भारतीय संघात कोहलीसह रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, शिखर धवन, कुलदीप यादव  आणि जसप्रीत बुमरा हे हुकुमी एक्के आहेत. वर्ल्ड कप इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा जेतेपद जिंकले आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी 2-2 वेळा हा पराक्रम केला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय