इंग्लंडचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार?; कॅप्टनचा ट्विट व्हायरल  

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३०८ धावाच करता आल्या.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 28, 2020 13:03 IST2020-11-28T13:02:49+5:302020-11-28T13:03:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Can get you in as a counter attacking batsman: Virat Kohli responds as Harry Kane enquires for RCB place | इंग्लंडचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार?; कॅप्टनचा ट्विट व्हायरल  

इंग्लंडचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार?; कॅप्टनचा ट्विट व्हायरल  

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३०८ धावाच करता आल्या. या सामन्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे. इंग्लंडचा फुटबॉल संघाचा कर्णधार हेरी केन ( Harry Kane) यानं क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्याने तो व्हिडीओ विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांना टॅग करून एक प्रश्न विचारला आणि त्यावर कोहलीनं उत्तर दिले.

विराट आणि केन यांची घट्ट मैत्री आहे. या दोघांचे अनेक फोटो आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतील. केननं फलंदाजी करतानाच्या व्हिडीओवर लिहिले की, मॅच विनिंग खेळी... विराट कोहली आणि RCB पुढील मोसमासाठी संघात जागा मिळेल का? 



 त्यावर विराटनं लिहिलं की,''चांगली फलंदाजी केलीस.. आम्हाला आक्रमक फलंदाज मिळाला.'' 

 

Web Title: Can get you in as a counter attacking batsman: Virat Kohli responds as Harry Kane enquires for RCB place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.