Join us

संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकतो - कार्तिक

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याने आयपीएलमध्ये यशस्वीपणे संघाचे नेतृत्व करणाऱ्या माजी कर्णधार गौतम गंभीरचे स्थान घेणे कठीण आहे, असे सांगितले. तथापि, केकेआर संघाला प्लेआॅफमध्ये पोहोचवण्याची आणि संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आपल्यात आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:48 IST

Open in App

कोलकाता - कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याने आयपीएलमध्ये यशस्वीपणे संघाचे नेतृत्व करणाऱ्या माजी कर्णधार गौतम गंभीरचे स्थान घेणे कठीण आहे, असे सांगितले. तथापि, केकेआर संघाला प्लेआॅफमध्ये पोहोचवण्याची आणि संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आपल्यात आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

केकेआर संघाने दोन वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावून देणारा कर्णधार गंभीरला संघात कायम न ठेवता तामिळनाडूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला ७.४ कोटी रुपयांत खरेदी करून आपल्या संघात घेतले. गौतम गंभीरने केकेआरसाठी जे मिळवले ते शानदार आहे, असे कार्तिकने सांगितले. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ व २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे २०११, २०१६ व २०१७ मध्येही त्याच्या नेतृत्वाखालील संघ प्लेआॅफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. कार्तिकजवळ आयपीएलमधील अनुभवाची कमतरता नाही. त्याने आतापर्यंत आरसीबी, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स व गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :दिनेश कार्तिकक्रिकेटआयपीएल लिलाव 2018