भारताविरुद्ध मालिकेसाठी ग्रीनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

Australian Cricket Team : भारताविरुद्ध मालिकेसाठी युवा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन याचा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:07 AM2020-10-30T04:07:32+5:302020-10-30T07:12:26+5:30

whatsapp join usJoin us
Cameron Green joins Australia for series against India | भारताविरुद्ध मालिकेसाठी ग्रीनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

भारताविरुद्ध मालिकेसाठी ग्रीनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : भारताविरुद्ध मालिकेसाठी युवा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन याचा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. 
याशिवाय बिग बॅशमध्ये दमदार कामगिरी करणारा मोझेस हेन्रिक्स याला तीन वर्षानंतर स्थान देण्यात आले. कसोटी मालिकेआधी भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात  २७ नोव्हेंबरपासून तीन वन डे सामन्यांची मालिका आणि ४ ते ८ डिसेंबर दरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कॅमेरुनची स्थानिक स्पर्धेतील कामगिरी दमदार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी  रिकी पॉंटिंगनंतर इतका प्रतिभावान पहिलाच खेळाडू, असे ग्रीनचे वर्णन केले होते. हेन्रिक्सच्या नेतृत्वात सिडनी सिक्सर्सने बिग बॅशचे जेतेपद पटकवले होते. आयपीएलदरम्यान जखमी झालेला मिशेल मार्श याचा विचार मात्र करण्यात आला नाही. 

ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी-२० संघ : आरोन  फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टोन एगर, ॲलेक्स कारे, पॅट कमिन्स, कॅमेरुन ग्रीन, जोश हेजलवुड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्वेसल, डॅनिअल सैम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिशेल मार्श, मार्कस स्टोइनिस, मैथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
 

Web Title: Cameron Green joins Australia for series against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.