Join us  

CAA : नागरिकत्व कायद्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

Citizen Amendment Act : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:44 PM

Open in App

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सध्याच्या घडीला भारतामध्ये गंभीर वातावरण आहे. या कायद्याला बऱ्याच जणांनी विरोध केला आहे. त्याटबरोबर काही जणांनी या कायद्याला संमतीही दर्शवली आहे. आता तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. शास्त्री या कायद्याबाबत नेमके काय म्हणाले...

शास्त्री या कायद्याबाबत म्हणाले की, " जेव्हा एक भारतीय म्हणून मी या कायद्याकडे पाहतो, तेव्हा मला जाणवते की भारतीय संघातही विविध धर्मातील खेळाडू आहेत. पण प्रत्येकाची जात आणि धर्म वेगळे असे तरी ते भारतीय आहेत. मी सर्वांनाच याबाबत भूमिका घ्यायला सांगतली असून याबाबत सबुरी ठेवण्याचा सल्ला मी संघाला दिला आहे. पण या गोष्टीमध्ये मला सकारात्मकता दिसत आहे."

याबाबत शास्त्री पुढे म्हणाले की, " मला पूर्णपणे विश्वास आहे की, सरकार जर एखादा निर्णय घेत असेल तर त्याच्या त्यामागे काही तरी विचार असेल. त्यांनी याबाबत अभ्यास केला असेल. अजून या गोष्टींमुळे भारतीयांना काही लाभ नक्की होईल. मी कोणत्याही धर्माबाबत बोलत नाही. कारण जेव्हा मी देशासाठी खेळतो तेव्हा मी भारतीय होऊन जातो."

या कायद्यामुळे काही भारतीयांचे नागरिकत्न काढून घेण्यात येऊ शकते, असेही बोलले जाते. याबाबत तुम्हाला काय वाटते? यावर शास्त्री म्हणाले की, " मी पूर्णपणे हा कायदा वाचलेला नाही. जे मला याविषयी माहिती आहे आणि माझे मत याबाबत काय आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. भारतीयांना याबाबत संयम ठेवावा लागेल आणि शांतपणे या गोष्टीचा विचार करावा लागेल."

टॅग्स :रवी शास्त्रीनागरिकत्व सुधारणा विधेयक