Join us  

कोहली-शास्त्री आनंदी; 'ती' विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मान्य होण्याची शक्यता

आगामी बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाने केलेली मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मान्य होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 5:11 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ट्वेंटी-20 सामना 25 नोव्हेंबरला संपणार आहे.

मुंबई : आगामी बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाने केलेली मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मान्य होण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तशा हालचाली सुरू झाल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आनंद झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांची विनंती केली होती. ती मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ सुरुवातीला तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या कालावधीत भारताला केवळ एकच सराव सामना खेळता येणार आहे. मात्र, कोहली व शास्त्री यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे आणखी एका सराव सामन्याच्या आयोजनाची विनंती केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ती विनंती मान्य करण्याच्या दिशेने हालचाली केल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ट्वेंटी-20 सामना 25 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याच दिवशी पहिला सराव सामना खेळवण्याची तयारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दर्शवली आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 सामन्यात भारताचे कसोटी संघातील खेळाडू सहभागी होऊ शकणार नाही. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,'' क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. भारतीय संघाला आणखी एक सराव सामना खेळता येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला.''

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीबीसीसीआय