टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून सलामीच्या फलंदाजाची माघार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:01 PM2019-10-08T13:01:08+5:302019-10-08T13:01:56+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING: Smriti Mandhana out of ODI series against South Africa having suffered an injury during practice | टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून सलामीच्या फलंदाजाची माघार

टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून सलामीच्या फलंदाजाची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून पुण्यात सुरू होत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये वन डे मालिकाही होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे होणार आहे. सहा सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय महिलांनी विजय मिळवला आणि आता वन डे मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. पण, टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मानधनाला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. 


स्मृतीला सराव सत्रात ही दुखापत झाली आणि त्यामुळे तिला वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृतीनं 2 कसोटी सामने, 50 वन डे आणि 62 ट्वेंटी-20 सामने खेळण्याचा विक्रम केलेला आहे.

भारतीय संघ - मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया, एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा.

वन डे मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना - 9 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासून
दुसरा सामना - 11 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासून
तिसरा सामना - 14 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासून


 

Web Title: BREAKING: Smriti Mandhana out of ODI series against South Africa having suffered an injury during practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.