Join us  

ICC World Cup 2019: इंग्लंडच्या संघाला प्रॅक्टीस देतोय तेंडुलकर

कारण इंग्लंडची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 9:04 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट जगतामध्ये सचिन तेंडुलकर या नावाला फार वलय आहे. सचिन क्रिकेट जगतातील एक महान फलंदाज होता. त्यामुळे सचिनकडून शिकण्यासारखे बरेच आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ सराव करत आहे. कारण त्यांची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे.

 इंग्लंडचे आता तीन सामने शिल्लक आहेत. इंग्लंडचा संघ जर तिन्ही सामन्यांत पराभूत झाला, तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. कारण सध्याच्या घडीला इंग्लंडचे सहा सामन्यांमध्ये आठ गुण आहेत. त्यामुळे जर यापुढील तिन्ही सामने इंग्लंडने गमावले तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे इंग्लंडने आता या सामन्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तरही पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. कारण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ 6 सामने खेळला आहे आणि त्यांचे 10 गुण आहेत. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तर त्यांचे 10 गुण कायम राहतील. पण दुसरीकडे जर पाकिस्तानच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाला मागे सारून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहे. हा सामना जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या नेट्समध्ये थेट तेंडुलकरला पाचारण केले आहे. पण हा तेंडुलकर फलंदाज नसून गोलंदाज आहे. तो म्हणजे सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. 

 

इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाला जर तिन्ही सामने गमवावे लागले तर पाकिस्तानचा संघलउपांत्य फेरीत पोहोचू शकतो. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे सहा सामने झाले आहेत. या सहा सामन्यांमध्ये पाकिस्तानचे पाच गुण आहेत. त्यामुळे यापुढे पाकिस्तानचे तीन सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जर पाकिस्तानने जिंकले तर त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता येऊ शकते. पण त्याचबरोबर जर-तर या गोष्टीही यामध्ये पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019सचिन तेंडुलकरअर्जुन तेंडुलकरइंग्लंड