मोठी बातमी : भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात खेळणार २१२७ सामने, बीसीसीआयनं जाहीर केलं वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) शनिवारी २०२१-२२ या वर्षाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 04:35 PM2021-07-03T16:35:13+5:302021-07-03T16:35:54+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING NEWS: BCCI announces India’s domestic season for 2021-22, A total of 2127 domestic games will be played this season  | मोठी बातमी : भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात खेळणार २१२७ सामने, बीसीसीआयनं जाहीर केलं वेळापत्रक

मोठी बातमी : भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात खेळणार २१२७ सामने, बीसीसीआयनं जाहीर केलं वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI announces India’s domestic season for 2021-22 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) शनिवारी २०२१-२२ या वर्षाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांची घोषणा केली. कोरोना व्हायरसमुळे जवळपास दोन वर्ष स्थानिक क्रिकेट स्पर्धा झाल्या नव्हत्या, पण आता २७ ऑक्टोबर २०२१पासून सीनियर महिला वन डे लीग आणि सीनियर महिला वन डे चॅलेंजर्स ट्रॉफीनं सुरुवात होणार आहे. २०२१-२२ या कालावधीत बीसीसीआय २१२७ सामन्यांचे आयोजन करणार आहे आणि त्याचे वेळात्रकही बीसीसीआयनं जाहीर केलं.

२० ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येईल. देशातील सर्वात जूनी स्पर्धा रणजी करंडक १६ नोव्हेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत खेळवण्यात येईल. त्यानंतर २३ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२२ या कालावधीत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले जाईल. या स्पर्धांचे आयोजन करताना बीसीसीआय खेळाडूंच्या आरोग्याची व सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेणार आहे. २१ सप्टेंबर पासून स्थानिक क्रिकेटला सुरुवात होणार आहे.  

Web Title: BREAKING NEWS: BCCI announces India’s domestic season for 2021-22, A total of 2127 domestic games will be played this season 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.