Join us  

BREAKING: टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी

IPL 2020: Vivoने यंदा माघार घेतल्यानंतर अनेकांमध्ये रंगलेली चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:36 PM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलच्या तेराव्या पर्वासाठी मुख्य प्रायोजक (टायटल स्पॉन्सर) कोण, हा प्रश्न अखेर निकाली निघाला. ‘फॅन्टसी स्पोटर््स प्लॅटफॉर्म’असलेल्या ड्रीम ११ या ब्रॅण्डने २२२ कोटी रुपये मोजून मुख्य प्रायोजकपद मिळवले आहे. साडेचार महिन्यासाठी हा करार असेल, अशी माहिती आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झाले होते. बीसीसीआयनेही आयपीएलचा प्रायोजक असलेल्या चीनची मोबाईल कंपनी विवोसोबतचा करार मोडावा, अशी चाहत्यांची इच्छा होती. जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने विवोसोबतचा करार वर्षभरासाठी स्थगित केला. विवो आणि आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांसाठी २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. प्रत्येक हंगामासाठी विवो कंपनी बीसीसीआयला ४४० कोटींचा निधी देत होती.भारत आणि चीन संबंधात पुढील वर्षीही तणाव कायम राहिल्यास आणि विवोने प्रायोजकपद घेण्यास नकार दिल्यास ड्रीम ११ चा करार पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे २०२२ पर्यंत कायम राहणार आहे. ड्रीम ११ गेल्या काही वर्षांपासून आयपीएल प्रायोजनाशी जुळले आहे. टाटा समूहाने अंतिम बोली लावली नाही. बोली लावणाºयात बायजूस (२०१ कोटी)आणि अनअकॅडेमी (१७० कोटी) हे क्रमश: दुसºया आणि तिसºया स्थानी राहिले.इतर दोन हंगामात ड्रीम ११ बीसीसीआयला २३४ कोटी रुपये मोजेल. दोन भारतीयांनी सुरू केलेल्या या स्टार्ट-अप ब्रॅण्डला नंतर चांगलाच प्रतिसाद मिळाला. ड्रीम ११ मध्ये एका चिनी कंपनीची गुंतवणूक असली तरीही ब्रॅण्डची मुख्य मालकी ही भारतीयांकडेच असल्याने हा मुद्दा चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पष्ट केले.ड्रीम ११ च्या प्रायोजकत्वामुळे डिजिटल माध्यमांमध्ये आयपीएलचा चाहतावर्ग अजून वाढेल अशी बीसीसीआयला आशा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा लाभ होईल असा विश्वास बीसीसीआयला आहे. विवोच्या तुलनेत ड्रीम ११ मोजत असलेली रक्कम ही अर्धी आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीत ही रक्कम चांगली असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांचे मत आहे.

>बीसीसीआयची एक अट, टाटा सन्सची माघारप्रायोजकाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या टाटा सन्सने अचानक माघार घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सला ला प्रायोजक बनण्याच्या मोबदल्यात तीन वेगवेगळे ब्रँड प्रमोट करण्याची परवानगी हवी होती. यासाठी चांगली बोली लावण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या नियमानुसार स्पॉन्सर्सना आपल्या एकाच ब्रँडचे प्रमोशन करता येणार होते. हीच अट टाटा सन्सच्या विरोधात गेली.

 

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल