अखेरचे षटक टाकण्यास ब्राव्हो फिट नव्हता : धोनी

शिखर धवन याला देखील चेन्नईने जीवदान देताच त्याने ५६ चेंडूत नाबाद १०१ धावा कुटल्या. यानंतर धोनी म्हणाला,‘ब्राव्हो जखमी असल्याने मैदानाबाहेर गेला होता. (MS Dhoni)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 05:37 AM2020-10-19T05:37:40+5:302020-10-19T05:37:48+5:30

whatsapp join usJoin us
Bravo was not fit to bowl the last over: Dhoni | अखेरचे षटक टाकण्यास ब्राव्हो फिट नव्हता : धोनी

अखेरचे षटक टाकण्यास ब्राव्हो फिट नव्हता : धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह : ‘फिटनेसच्या समस्येमुळे अखेरचे षटक टाकण्यासाठी ड्वेन ब्राव्हो फिट नव्हता,’असे कारण दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शनिवारी सामना गमविणारा चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पराभवानंतर दिले.त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाने अखेरचे षटक टाकले. या षटकात दिल्लीने १७ धावा वसूल करीत सामना जिंकला.

शिखर धवन याला देखील चेन्नईने जीवदान देताच त्याने ५६ चेंडूत नाबाद १०१ धावा कुटल्या. यानंतर धोनी म्हणाला,‘ब्राव्हो जखमी असल्याने मैदानाबाहेर गेला होता. जडेजा किंवा कर्ण शर्मा यांंच्यापैकी एकाकडून मारा करुन घेण्याचा पर्याय होता. धवनला बाद करणे गरजेचे होते, मात्र आम्ही वारंवार झेल सोडले.विजयाचे श्रेय देखील त्याच्या फटकेबाजीलाच द्यावे लागेल.’

आमच्या फलंदाजांनी दहा धावा कमी केल्या,’ असे मत धोनीने व्यक्त केले. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितले की, खेळपट्टीवर धवन स्थिरावल्यास विजय आमचाच असेल,अशी मला खात्री होती.

ब्राव्हो होऊ शकतो ‘आऊट’: फ्लेमिंग
च्जखमी वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो काही दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी स्पर्धेबाहेर होऊ शकतो, असे चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे.

ब्राव्होच्या उजव्या पायाच्या दुखण्याने उचल खाल्ली आहे. दुखापत बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे दुखापत वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित पुढील काही सामन्यांना बाव्होला मुकावे लागू शकते. त्याच्या दुखापतीचा अंदाज घेता त्याला तंदुरुस्त होण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागू शकतो,’ असे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले. जडेजाने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची रणनीती आखली नव्हती. ब्राव्हो उपलब्ध नसल्याने आम्ही जडेजाला गोलंदाजी दिली,असे फ्लेमिंग यांनी सांगितले.

पहिले शतक‘खास’ -
१३ वर्षांपासून आयपीएलमध्ये आहे. हे पहिले शतक ‘खास’ म्हणावे लागेल. सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केल्यानंतरही २० धावांचे रुपांतर ५० धावांमध्ये करू शकत नव्हतो.आता आधीच्या तुलनेत अधिक फिट असल्याने ताजेतवाने वाटते. मानसिकदृष्ट्या आता सकारात्मक असून खेळपट्टीवर वेगवान धावा घेत आहे.  -शिखर धवन

Web Title: Bravo was not fit to bowl the last over: Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.