शिखर धवनवर बाऊन्सर आदळला अन् चाहत्यांचे श्वास रोखले गेले

वनवर बाऊन्सर आदळल्यानंतर चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:14 PM2019-09-06T16:14:29+5:302019-09-06T16:15:17+5:30

whatsapp join usJoin us
The bouncer hit at Shikhar Dhawan and the fans were stopped breathing | शिखर धवनवर बाऊन्सर आदळला अन् चाहत्यांचे श्वास रोखले गेले

शिखर धवनवर बाऊन्सर आदळला अन् चाहत्यांचे श्वास रोखले गेले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या कोणत्याही फलंदाजावर बाऊन्स आदळला आणि तो जायबंदी झाला की, चाहत्यांच्या मनामध्ये धस्स होतं. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथवर बाऊन्सर आदळला होता आणि त्याला एक दुखापतीमुळे त्यानंतर एका सामन्याला मुकावे लागले होते. आता तर भारताचा सलामीवीर शिखर धवनवर बाऊन्सर आदळल्याचे वृत्त आले आहे. धवनवर बाऊन्सर आदळल्यानंतर चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील 'अ' संघामध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशांत चोप्रासह धवन फलंदाजी करायला आले. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 20 षटकांचा खेळवण्यात आला. फलंदाजी करत असताना ब्युरान हेंडरिक्सचा एक उसळता चेंडू धवनच्या दिशेने आला. धवनला या चेंडूवर स्कुपचा फटका मारायचा होता. पण हा फटका मारताना धवनचा अंदाज चुकला आणि त्याच्या दिशेने आलेला बाऊन्सर त्याच्या मानेवर आदळला. बाऊन्सर मानेवर आदळल्यानंतर धवनने हेल्मेट काढले. त्यावेळी खेळ थांबला आणि चाहत्यांच्या मनात धस्स झाले. त्यानंतर संघाचा फिजिओ धावत मैदानात दाखल झाला. त्याने धवनच्या मानेला जाऊन बर्फ लावला. त्यानंतर धवन या साऱ्या गोष्टीमधून सारवला आणि पुन्हा एकदा खेळायला त्याने सुरुवात केली. या सामन्यात धवनने 36 चेंडूंत 51 धावांची खेळी साकारली.

बाऊन्सर आदळला, तो जमिनीवर पडला आणि त्याला फिल ह्युजची आठवण आली
एखाद्या खेळाडूवर बाऊन्सर आदळला आणि तो जमिनीवर पडला तर अजूनही क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियाचा दिवंगत सलामीवीर फिल ह्युजची आठवण येते. कारण ह्युजवर ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर ह्युज जमिनीवर पडला. त्यानंतर ह्युजला हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला होता, अशीच एक गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाबाबत घडली होती. तो फलंदाज होता स्टीव्हन स्मिथ. अॅशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मिथला चेंडू लागला आणि तोही जमिनीवर कोसळला होता. त्यावेळी त्याला ह्युजची आठवण आली होती, असे दस्तुरखुद्द स्मिथने सांगितले आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्मिथला बाद करता आले नाही. पण आर्चरने एका बाऊन्सद्वारे स्मिथला जायबंदी केले आणि त्यामुळेच स्मिथला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही.  स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.
स्मिथ जायबंदी झाल्यावर पाचव्या दिवशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन त्याच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र ऑस्ट्रेलियाने दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने धैर्याने खेळ करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवण्यात मोलाचा वाटा उचलला.

याबाबत स्मिथने पत्रकारांना सांगितले की, " जेव्हा माझ्यावर बाऊन्सर आदळला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरु होत्या. मला काही जुन्या गोष्टींची आठवण झाली. तुम्हाला माहिती असेलच मी नेमक्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. काही वर्षांपूर्वी अशीच एक वाईट घटना घडली होती. जेव्हा मला बाऊन्सर लागला तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा त्याच गोष्टीचा विचार आला होता."

Web Title: The bouncer hit at Shikhar Dhawan and the fans were stopped breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.